वारी

Submitted by तुषार विष्णू खांबल on 28 June, 2020 - 02:24

वारी
शब्दांकन :- तुषार खांबल

चुकणार माझी वारी
यंदा कोरोना तुझ्यापायी
माऊलीची शपथ मला
मी शांत बसणार नाही

पालख्या निघाल्या आकाशमार्गे
रस्ते राहिले मोकळे
ना कुठे रंगले भजन
ना रंगले कीर्तन सोहळे

ज्यांचा चाले प्रपंच यावर
ते झालेत आता त्रस्त
रुसला का विठ्ठल त्यांचा
म्हणोनी दिसती चिंताग्रस्त

काय मिळाले यातून तुला
आमची करोनी ताटातूट
माऊलीचे दर्शन म्हणजे
लेकरांचे असते सुख

दिसला नाही विठ्ठल माझा
नाही मला याची खंत
मानवात शोधावा देव
सांगून गेले साधू संत

डॉक्टर असो की पोलीस
किंवा पालिका कर्मचारी
वंदीन त्यांचे चरण
करेन पूर्ण माझी वारी

Group content visibility: 
Use group defaults