ती आली तर

Submitted by मनोजकुमार देशमुख on 27 June, 2020 - 08:30

रंग किती गगनात पसरले ती आली तर
मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर

उभा असा मी बस थांब्यावर जाण्यासाठी
कुठे जायचे तेच विसरले ती आली तर

नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली
भले भले ते ना सावरले ती आली तर

मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले
पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर

मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला
वाह का आपसूक उमटले ती आली तर

मोहक मुखडे तिच्या सारखे किती पाहिले
का क्षणभर ते हृदय थांबले ती आली तर

Group content visibility: 
Use group defaults

वा छान !
असेच लिहित रहा
मला ह्याची आठवण करून दिलीत
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागते