प्रवाहू पुन्हा की नव्याने थिजू मी ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 June, 2020 - 00:24

जिण्याचा कशीदा तुझ्याविण विणू मी ?
गझल गझलियतविण मुकम्मल करू मी ??

कधी प्रेम नजरेत केव्हा उपेक्षा
तुझ्या पिंजऱ्यातिल खुळे पाखरू मी

घटस्फोटिता, वांझ, थोराड, विधवा
किती काळ ही लक्तरे वागवू मी ?

जखम पूर्ण भरली म्हणेतो चिघळते
प्रवाहू पुन्हा की नव्याने थिजू मी ?

स्वतःभोवती घेतली एक गिरकी
वडाभोवताली कशाला फिरू मी ?

================

पिते दोन मिसऱ्यातली धुंद होते
कशाला पुन्हा ती 'सुला' मागवू मी ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कृपा करून शिकवाल का गझल कशी करायची असते? सोलापूच्या इंजिनीअरींग महाविद्यालयात आहे मी. मला खरच शिकायच आहे ओ सुप्रिया ताई... मला वृत्ते, मुक्तछंद वगैरे काहीही माहीत नाहीये. चार दिवसांपूर्वी वैभव जोशीचा इंटरव्युव्ह पाहून इथे आलो. दोन दिवसांच्या घालमेलीनंतर आज एक कविता टाकलीय पण दिसत नहीये. मराठीतून वापरता ही येत नाहीये साईट.