स्नेहीभेटी का करतात?

Submitted by राजसी on 24 June, 2020 - 11:18

सध्या कोरोनामुळे आमच्या सोसायटीमध्ये visitors ना येणे allowed नाहीये. मे च्या शेवटच्या आठवड्यापासून maids ना re-entry allow केली होती. बाकी फक्त दूध, भाज्या, औषधे, किराणा, अवजड वस्तू ह्या गोष्टींची doorstep delivery allowed आहे. पैशाला पासरी जे e-retail packages येतात ते एका coomon रूम मध्ये ठेवून मग लोकांनी तिथे येऊन घेऊन जायचे अशी सध्या सिस्टिम आहे.
जेव्हापासून maids allowed केल्यात तेव्हापासून आता आम्हाला visitors पण हवेत अशी तमाम लोकांची सतत मागणी आहे. आमच्या घरी कधीच कोणाचं जाणं-येणं नसतं. एक नातेवाईक इथेच आहेत. त्यांच्याकडे आम्ही दर weekend ला जाणे-येणे असते. आता almost चार महिने होतील भेटलो नाहीये.
सोसायटीच्या ग्रुप वर इतकी जोमदार मागणी आहे visitors allow करा की मला प्रश्न पडला लोकं खरंच इतकं एकमेकांकडे जातात का? का जातात? काय मिळतं?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एरवी जात नसतील विशेष.पण आता फॉरबिडन गोष्ट जास्त हवीशी वाटते त्या नियमाने व्हिजिटर हवेसे वाटत असतील.
अर्थात नातेवाईक, विशेष करून आई बाबा, भावंडं दूर राहत असतील तर भेटावेसे वाटणार.

हवा तो सहवास हवाहवासा वाटणं साहजिक आहे .ठराविक मित्र - मैत्रिणीशी/नातेवाईकांशी गप्पा मारल्यावर किंवा बोलल्यावर छान वाटतं मानसिक आधार मिळतो आणि काही गोष्टी कुटुंबात बोलू शकत नाही ते त्या व्यक्तीजवळ बोलता येते.. मनमोकळं करता येतं..म्हणून लोक जात येत असतात एकमेकांकडे..पण मी तर म्हणतो शक्य तितक्या माणसांना भेटावं अनोळखी/ ओळखीचे/ चांगले /वाईट.. भेटल्यानंतरच्या अनुभवातून आयुष्याची आपण न पाहिलेली बाजू दिसते..

चांगल्या माणसाकडून माणूस म्हणून कसं असावं हे उमगतं.. आणि वाईटांईकडून कसं नसावं हे कळतं..

ऑलमोस्ट सेम केस विथ अस. पण सध्या तरी कुणीही कुणाकडेही जाणं - येणं जरा काळजीपूर्वकच करावं हे मा वै म.
असले किस्से आमच्या इथेही झालेत. अगदी विजिटर नी त्याची स्वतःची गाडी जरा लांब पार्क केली आणि ओनर स्वतः च्या गाडीतून त्यांना घेऊन आला, गार्ड्स नी अडवायला नको म्हणून. वर उर्मट उत्तरंही मिळालीत ओनरकडून गृप्स वर. असो.

नाही भेटलात तरीही चालू शकेल, ३ महिने काढलेत अजून काही दिवस, की फर्क पैन्दा? आणि विडिओ कॉल्स इ. वगैरे आहेतच ना. काळजी घेणे हेच उत्तम.

आमच्या घरी कधीच कोणाचं जाणं-येणं नसतं.
>>> मग तुम्हाला नाही कळणार समजावले तरी कि लोक एकमेकांना का भेटतात...

प्रत्यक्ष भेटणे याचा आनंदच वेगळा आहे! आपल्या सुहृदांना आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपण देहबोलीतून देखील खूप संवाद साधतो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला भेटल्यावर कितीतरी उर्जा मिळते. मनावरचा ताण हलका होतो.
वर्षभरानंतर परदेशातून परत आल्यावर आईला घट्ट मिठी मारल्यावर जे वाटतं ते रोज व्हिडिओ कॉल केला तरी वाटणं अशक्य आहे.
सध्याच्या परिस्थितीत आपल्याला शक्य असेल तर सरळ काही काळ बाहेर रस्त्यावर किंवा एखाद्या मोकळ्या मैदानात भेटावं. एका वेळी चार ते सहापेक्षा अधिक जणांनी एकत्र भेटू नये. The super spreader events for Corona have been mostly indoor places with air conditioning where crowds spent at least a couple of hours together. तेव्हा मोकळ्या, गर्दी नसलेल्या ठिकाणी सुयोग्य अंतर ठेवून भेटण्यात फार धोका नाही असं मला वाटतं. अर्थात हाय रिस्क लोकांनी अर्थात ज्ये ना किंवा इतर कमी प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांनी जनसंपर्क कमीच ठेवावा आणि शक्यतो सतत घराबाहेर जाऊ नये.
एकदा व्हिजिटर्स ना परवानगी दिली तर लोकं घरात पन्नास माणसांना बोलावून पार्टी करतील अशी दाट शक्यता असल्याने बहुतेक सोसायट्यांमध्ये अजून परवानगी देत नसणार. जे योग्यच आहे.

मी एकीला personal message केला जेव्हा ती अगदीच कळकळीने गृपवर पाहुणे allowed करा सांगते आहे असं वाटलं. तिचे वयस्कर आई-वडील समजा दुसरीकडे ही इकडे असं काही असेल तर सोसायटीला request केली तर अपवाद म्हणून allow करतील. पण तसं काही नव्हते - तिघी रूममेट्स राहतात आणि तिला तिच्या लोकल मित्र-मैत्रिणींना बोलवायचे आहे. आता ती एकटीच राहते आहे, कोणी कुटूंबिय गावात नाहीत. अश्या वेळेस तिची इमोशनल support साठी मागणी अगदीच समजू शकते. पण बरीच कुटुंब कबिला असणारी मंडळी पाहुणे allowed करा म्हणून मागणी करत आहेत.
Video कॉल /फ़ोन कॉल करुन भागत नसेल का? बाहेरचं कोणी आपल्याकडे येणार म्हणजे किती मनस्ताप!
लोकांना भेटायची सवय म्हणाल तर आमची दर आठवड्यात भेटायचा नेम पण मोडलाय. ज्या कोणाशी भेटावं वाटतं त्यांना video कॉल करतो. ह्या काळात मी न भूतो न भविष्यती मंडळींशी विडिओ/फोन कॉल केले आहेत. कितीतरी वर्षनुवर्षं न भेटलेली मंडळी कॉल करतात आणि विचारतात की कशी आहेस?

Maids ज्या भागातून येतात तिथे एक लेन सील केल्यामुळे आता परत maids entry बॅन केली आहे म्हणे. त्यामुळे visitors आता गॅसवरून उतरले आहेत Happy आजूबाजूला जेवढी hotels/ service apts आहेत ते सगळे quarantine facility झालेत. 500मीटर वरच्या complex मधे एक महाराष्ट्रातून आलेले positive निघालेत. त्यांच्याकडच्या maids अजून 5-7 घरी कामाला जात होत्या. Maid positive नाहीये पण दुसरी फॅमिली positive निघाली आहे. दिल्लीहून आलेले positive निघाल्याचे कितीतरी केसेस आहेत.

Actually, काम धंद्यासाठी घरचे लोक बाहेर जाऊ लागल्यावर मेड्स आणि व्हीसीटर्स वर बंदी घालणे मूर्खपणा आहे.
हे म्हणजे मुख्य दार उघडे टाकून मोरीला बोळा लावण्या सारखे आहे.

मान्य आहे, 20 25 पाहुणे बोलावून घरगुती समारंभ करू नका, पण एखादे कुटुंब यायला हरकत नाही, सेम goes विथ मेड्स,

कॉलनी मध्ये येणाऱ्या माणसांचे temp , SPO2 घेणे वगैरे हा पण स्वतःच्या समाधानासाठी केलेला उद्योग आहे,
येणारा माणूस लक्षणे न दाखवणारा वाहक असू शकतो, किंवा संसर्गाची सुरवातीच्या दिवसात असू शकतो.
किंवा बॉडी temp दुसऱ्या कुठल्या कारणाने वाढलेले असू शकते.

घरी मेड्स येऊ देत, मास्क लावून काम करू देत, लहान मुले, म्हातारी माणसे यांना त्या वेळात एका खोलीत बसवून ठेवा.
मेड्स ना आल्या आल्या हात धुवायला लावा,
त्यांच्या फार जवळ उभे राहून तुम्ही काम करू नका.
सर्दी खोकला सारखी लक्षणे दिलेत असतील तर तिला सुट्टी द्या.

सेम goes for visitors.
That should be enough.

स्नेहीभेटी नक्कीच कराव्यात. पण परिस्थिती जर कोणाच्याही जीवाशी खेळणारी असेल तर त्या भेटी टाळण ही महत्वाच आहे. दर आठवड्याला भेटणार्‍या व्यक्ती चार महिने भेट नाही म्हणून उगाच भेट झाली पाहिजे या आग्रहाखातर या भेटी करणे योग्य नाही. करोना मुळे नक्कीच या भेटींवर फरक पडलाय. पण विषाची परिक्षा का घ्यावी. आजकाल कितितरि वेगळे पर्याय उपलब्ध आहेतच की भेटी साठी. आपल्या सोबत आपण ईतरही लोकांचे आयुष्य धोक्यात आणतो हे ही लक्षात घ्यायला हवे.
आजच एका छोट्या मुलिचा फार सुंदर व्हिडिओ बघितला व्हॉटसप वरती. ज्यात ती छान ड्रेस घालून पार्टीला जायचे म्हणते आहे. मुलगी आणि आई यांच्यातले संवाद फार सुंदर आहेत. मुलगी बाहेर पार्टीला जायचे म्हणतेय, आईस्र्किम खायचे म्हणते आहे. आई तिला सांगते की आपण पार्टी ला नाही जाउ शकत अजून करोना गेला नाही. त्यावर ती निरागस पणे म्हणते लॉकडाऊन संपला आहे की .... या वर तिची आई तिला समजावते की लॉकडाऊन संपला याचा अर्थ करोना संपला असे नाही. बाहेर अजूनही करोना आहे....
लॉकडाऊन संपला म्हणजे करोना गेला हे वाक्य खुप काही सांगुन जाते. सध्या परिस्थिती अशीच झाली आहे लोकांची. लॉकडाऊन संपला म्हणजे सगळे सुरळीत झाले असा ग्रह करून घेतला आहे काहीजणांनी.

निर्झरा प्रतिसाद आवडला.
आमच्याकडे तर लोक फारच बेपर्वा वागत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीज्/ pool parties करत आहेत. Everyone needs to be on same page otherwise it won't work !!
तुमचे पण पटले राजसी Happy

निर्झरा...
ती अंशुमन विचारेची मुलगी..

आमच्याकडे तर लोक फारच बेपर्वा वागत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीज्/ pool parties करत आहेत.
>>> ओव्हरऑल अमेरिकेत आता लोक बिंदास झालेत... आम्ही पण पार्टी वगैरे सुरु केले आहे... किती दिवस घरात बसणार...
जी ले अपनी जिंदगी....

मला प्रश्न पडलाय जे लव्हबर्ड्स म्हणजे प्रेमी युगुलं असतील जे आधी नित्यनेमाने रोज संध्याकाळी भेटत असतील पण आता अशक्य झाले असेल. त्यांची काय स्थिती झाली असेल या काळात ?

आता नाहीये. जसे म्हणायचो तसे तिच्याशीच लग्न केले आहे. पण जेव्हा मला गर्लफ्रेंड होत्या त्या काळात कोरोना आला असता तर मी काहीही जुगाड करून तिला भेटायला गेलो असतो.

आताही जिगरबाज प्रेमवीर हे धाडस करत असतीलच. फक्त मास्क घालून चुंबन कसे घ्यायचे हा वेगळाच प्रश्न त्यांना पडत असेल Happy

>>>मला प्रश्न पडला लोकं खरंच इतकं एकमेकांकडे जातात का? का जातात? काय मिळतं?>>> सामान्य परिस्थितीत वरचे वर भेटणारे तसेच समारंभ करण्यास कारणे शोधून आनंदात वेळ व्यतित करणारे अनेक जण आहेत. हे का जातात साठी माझे उत्तर वजा स्वानुभव आहे. यात भावनिक संबंध सुदृढ होतात, जिव्हाळा वाढतो, प्रत्यक्ष भेट अनौपचारिक असल्याने अनेक गोष्टी देहबोली, संवाद, गप्पा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्श या द्वारे साध्य होतात. म्हणजे हे मिळतं. जे व्हिडियो कॉल द्वारे कमी प्रमाणात घडते , अर्थात यात आपल्या सवयीचा अन सोयीचा तसेच ओढीचा भाग मोठा असतो. माझ्या परदेशातील मुलींशी व्हिडियो कॉल या माध्यामातून वरील अनुभव मिळवण्याचा प्रयत्न असतो आणि तो बर्‍याच अंशी साध्य होतो. स्पर्शाची उणिव मात्र भासते. अशा प्रकारे "का जातात व काय मिळते" याचे हे माझे आकलन आहे.
परंतु सद्य परिस्थितीत अनेक अज्ञात घटकांमुळे व कोरोना कशा प्रकारे पसरू शकतो यावर बरेच काही स्पष्ट नसल्यामुळे गेल्या ३ ते ४ महिन्यात जे काही कऋन आपण स्वतःस सुरक्षित ठेवले तेच व तसेच करणे आवश्यक आहे. कितीही ओळख असली तरीही त्या व्यक्तींना शक्य तोवर प्रत्यक्ष न भेटणे आणि त्याची गरज असल्यास व्हिडियो, टेलिफोन इत्यादींचाच वापर केला पाहिजे. मोठे गट करून सण साजरे करणे अत्यंत अयोग्य आहे.

हम्म.
मी स्नेही हा शब्द मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी ह्या अर्थाने वापरला होता. आई-वडील, मुलं, बहीण-भावंड,सख्खे -चुलत ह्याबद्दल मला प्रश्न पडलेला नाही.आमचे पण सगळ्यांसारखेच उन्हाळ्याच्या सुट्टीत मूळगावी जायचे प्लॅन्स होतेच. आम्ही पण मूळगावी घरी गेलो की काका, मामा, मावशी असे जाऊन भेटतो.

रुनमेश च्या पोस्ट मुळे मला नवीच बाजू लक्षात आली जी माझ्या ध्यानीमनी नव्हती.
सध्या आम्हाला दुसऱ्या प्रांतात राहत असलो तरी extended फॅमिली असल्यामुळे इतरांकडे जाणं-येणे असण्याची गरज भासत नसावी.
लहानपणी आम्ही असेच वेगळ्या शहरात लहानचे मोठे झालो. आमच्या शेजारच्या मावशीबद्दल अजूनही आमच्या मनात ऋणानुबंध आहे. आम्ही अजून शेजारी असलो असतो तर कदाचित social distancing पाळलं नसतं. दोन्ही घराची दार सतत उघडी राहिली असती. शेजारच्या कॉम्प्लेक्स मधे राहत असतील तर नक्कीच उठून गेलो नसतो.

Visitors मागणारी मंडळी कोरोनाच्या काळात (माझ्या मते) not so essential लोकांना का भेटत असावेत?

>>मी स्नेही हा शब्द मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी ह्या अर्थाने वापरला होता. >> मला देखील तेच अभिप्रेत आहे. थोडीएशी अदलाबदल झाली पण मूळत" स्नेहीच समाविष्ट आहेत

निर्झरा...
ती अंशुमन विचारेची मुलगी..
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
राजसी आणि मी _अस्मिता धन्यवाद.

मला प्रश्न पडलाय जे लव्हबर्ड्स म्हणजे प्रेमी युगुलं असतील जे आधी नित्यनेमाने रोज संध्याकाळी भेटत असतील पण आता अशक्य झाले असेल. त्यांची काय स्थिती झाली असेल या काळात ?
जर ते खरच एक मेकांवर प्रेम करत असतील तर भेटण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करत असतिल आणि एक दुजे के लिये सारखं आपली परिक्षा घेत आहेत असा समज करून काही दिवस दुरावा सहन करतील.;)