एक प्रेम वेडी - पायल

Submitted by Rajsmi on 24 June, 2020 - 05:03

(पहिल्यांदाच काहीतरी लिहितेय सर्वाना आवडेल अशी अपेक्षा पण तरीही काही चुका असल्यास तुमच्या कंमेंट मधून सूचित करावे हि विनंती)

पायल पाटील

कॉलेज मध्ये lecture चालू असताना मध्येच मोबाईल वाजला.
तिने चपळाईने कट केला, पुढे lecture संपेपर्यंत मनात शंकेने काहूर माजल होतं.
का फोन केला असावा? काही काम असेल का? काय बोलायचं असेल ?
तो ठीक असेल ना? असंख्य प्रश्न डोक्यात होते.
तोच बेल वाजली, भानावर येऊन फ्रेंड्सना डोकं दुखतंय असं सांगून घरी आली.
फ्रेश होऊन विचार करत असताना आईचा आवाज आला, ताईंचा फोन आला होता.
ताई तुला कॉल करत होत्या तू उचलला नाहीस मी म्हणाले तू नंतर करशील.
तू फ्रेश झालीस का? खाऊन घे नंतर कॉल कर .
ताई म्हणजे पायलची आत्या अलका पाटील.आत्या मोठी असल्याने सर्व तिला ताई म्हणूच हाक मारतात तिची मुलं सुद्धा.
आत्याला तीन मुलं दोन मुली एक मुलगा नेत्रा, राज आणि अमिता. दोन्ही मुलींची लग्न झाली,
मामा रिटायर्ड झाले राज जॉब करतो सर्व ठीक चालू होतं पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं,
जस नियतीच्या मनात काही होतं तसंच पायलच्या मनात राज होता जे कुणालाच ठाऊक नव्हतं.
राजलाही ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. दोघांच्या मद्धे सहा वर्षाचे अंतर त्याला ती लहान बहीण असल्यासारखी
दुधात मीठ पडावी अशी स्थिती.
तरीही खूप हिम्मत करून तिने त्याला कॉल केला मनातला सांगून टाकलं, अपेक्षित उत्तर मी तुला त्या नजरेने कधी पाहिलं नाही,
माझ्या मनात तसं काही नाही.
एक वर्ष झालं कधीतरी विचार करेल ह्या आशेवर वाट बघत राहिली फोर्स करण्याची इच्छा नव्हती.
काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा ठेऊन होती.
एक दिवस संडेला बँकेच्या एक्सामची तयारी करत असताना बँकेचा कॉल आला हॉलटिकेट collect
करण्याबाबत ती खुश होती gradution होऊन चार वर्ष झाली ती जॉब साठी interviews देत होती.
मनासारखं काहीच होत नव्हतं आता तिला वाटलं सर्व ठीक होईल सुरवात हि चांगली झाली होती,
आता सर्व स्वप्न हळू हळू पूर्ण होतील may be राज विचार करेल आणि ताईंचा फोन येईल लग्न ठरल्याचा तो हो बोलेल ह्या स्वप्नात होती.
हा विचार येतो न येतो तोच ताईंचा फोन आला
ताई :- हॅलो
ती :- हा ताई बोला,
ताई :- राजचं लग्न ठरलं
ती :- अरे वाह ! good news , थांब आईशी बोल.
नंतर आई आणि ताई काय बोलत होत्या त्याकडे तिचं लक्ष नव्हतं,
लग्न ठरल्याचा फोन येईल हे तिचं स्वप्न पूर्ण झालं पण तरीही तिचं स्वप्न तुटलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे कथा. तुम्ही कथेला अजून भावनिक रित्या खुलवू शकला असता ... पुढील लेखनास खूप शुभेच्छा...