भाग आठवा - सरप्राईज.
मध्यंतरी बराच काळ लोटला होता. पुलाखालून बरंचं पाणी वाहून गेलं होतं. तिघांची मस्त मैत्री झाली होती आणि काळाबरोबर ती आणखीनच बहरत होती, फुलत होती. हर्षला तर हे सगळं स्वप्नवतच वाटतं होतं. आधीची नयना आणि आताची नयना ह्यात जमीन आस्मानाचा फरक होता. कधीतरी तिचं ते पहिलं रूप आठवून त्याला हसू यायचं आणि आश्चर्यही वाटायचं. माणसं बदलतात पण इतके बदलतात हे त्याला ठाऊक नव्हतं. वर्षभरात हर्षच प्रमोशनदेखिल झालं होतं. केवळ नयनामुळे नाही तर त्याने तशी मेहनतही घेतली होती. नयना नसली की, तोच ऑफिस सांभाळयचा आणि म्हणूनच ऑफिसच्या किल्ल्या नेहमीच हर्षजवळ असतं.
...................................................................................................................................................................................................................
20 नोव्हेंबर, रात्रीची 11:30 ची वेळ. अनुराधाचा मोबाईल वाजला तसा तिने पटकन पिकअप केला. समोरून हर्ष घाबर्या आवाजात बोलत होता -
"अनुराधा खूप मोठा प्रोब्लेम झालाय..प्लिज तु पटकन ऑफिसला येशिल का?"
"आता? इतक्या रात्री? काय झालयं नक्की?" अनुराधाही आता थोडीशी घाबरली होती.
"अग असं फोनवर नाही सांगू शकतं.. तु प्लिज लवकर ये इथे"
इतकचं बोलून हर्षने फोन कट केला..
खरंतरं तिचे मित्र मैत्रिणी कधीतरी असेच काहीबाही सांगून प्रान्क करतात हे तिला माहीत होतं पण हर्ष असं काही करेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं आणि म्हणूनच ती तिची स्कुटी घेऊन भरधाव निघालीच..
ऑफिसच्या गेटवर तिला हर्ष दिसला. पांढर्या रंगाच्या शर्टावर त्याच्या कसल्यातरी लाल रंगाचे डाग होते..चेहर्यावरही तसेच. सुकलेले डाग स्पष्ट दिसत होते..
जशी अनुराधा जवळ आली तसा हर्ष तिला बिलगून रडू लागला..
"अरे झालंय तरी काय सांगशील काय?? आणि हे तुझ्या शर्टावर कसले डाग आहेत?" अनुराधा न राहवून प्रश्न विचारत होती.
"अनुऽऽऽ अनुराधा माझ्या हातून नयना मॅडमचा खून झालाय.."
हर्ष कसातरी चाचरत म्हणाला.
काय?
हे ऐकून तर अनुराधाच्या पायाखालची जमीनच सरकली..
"बाॅडी कुठे आहे तिची??" अनुराधाने सावरत प्रश्न विचारला..
"त्या तिकडे ऑडिटोरियम मध्ये" हर्ष थंड स्वरात म्हणाला..
"चल बघूया" थोडीशी हिंमत करत अनुराधा ऑडोटोरियमच्या दिशेने निघाली.
हर्ष मुकाट्याने तिच्यामागे चालू लागला..
ऑडिटोरियममध्ये पोहचल्या पोहचल्याच.. हर्षने अगोदरच प्लान केल्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या हलकेच अनुराधाच्या अंगावर येऊन पडतात आणि त्याचक्षणी स्पीकरमधून -
"हॅपी बर्थ डे टू यू.. हॅपी बर्थ डे डिअर अनुराधा.. हॅपी बर्थ डे टू यू"
हर्ष ने रेकॉर्ड केलेला आवाज तिच्या कानी येतो. हर्ष लगेच विडीयो प्लेय करतो.. समोर मोठ्या स्क्रीनवर तिचे आणि हर्षचे एकत्रित असलेले फोटो झळकतात. अनुराधा सरप्राईज होत पाहत बसते. हर्ष लगेच पडद्यावरच्या निळ्या उजेडातून केक आणि कॅडल घेऊन येतो. घड्याळात बरोबर 12 वाजून 3 मिनिटे झालेली असतात. अनुराधालाही एव्हाना कळून चुकतं की, हर्षने तिला जगावेगळं सरप्राईज दिल आहे ते..
तिला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण एक तर हर्षने तिला आधी किती घाबरवलं होतं. थोडासा रागही आलेला पण तरीही तिला हे सरप्राईज खुप आवडलं होतं. अनुराधा केक कापते आणि हर्षला थॅन्क्यू म्हणते.
"इट्स माय प्लेजर..तु नुसता केक खाणार का?? केकबरोबर तुला नयनाचा टाॅमेटो साॅसही हवाय खायला?
हर्ष लाल डाग असलेला शर्ट पुढे करत मिश्किलपणे हसत म्हणाला.
"तु आता मार खाणार आहेस, किती घाबरले होते मी माहितेय तुला?
ती केकचा एक तुकडा त्याच्या अंगावर फेकत म्हणाली..
तसा तो ही चेकाळतो मग दोघेही एकमेकांवर केक उडवत धावत पळत मस्ती करतात. दोघांचेही ड्रेस केकच्या क्रिमने माखले जातात. शेवटी एकदाचे दमून अनुराधा तिथल्याच एका चेअरवर बसते तसा हर्ष तिच्या जवळ येतो आणि एकदम गंभीर होत अजून एक सरप्राइज आहे तुझ्यासाठी असं म्हणून अजून एक विडीयो प्लेय करतो. त्या विडीयोत तो स्वतःच बोलत असतो. बॅकग्राऊंडला कुठलं तरी एखादं छानसं स्वीट म्युझिक वाजत असतं. स्पीकरमधून शब्द बाहेर पडतात -
हाय अनुराधा.
खरंतरं खुप दिवसापासुन मला तुला हे सांगायचं होतं पण कसं सांगू आणि कुठे सांगू हेच कळत नव्हतं म्हणून हा विडीयो मी रेकॉर्ड करून सांगतोय..कदाचित फेस टू फेस तुला हे सांगण मला कधीच जमलं नसतं.
अनुराधा आय लव्ह यु ...खरंच.. जेव्हापासून तुला पाहीलं आहे तेव्हापासून मी माझा असा उरलोच नाही माझं ह्रदय, माझं स्वप्न, माझं अस्तित्व, माझं जगणं. सगळं काही तुझ्यात सामावतं गेलं..
माझं ह्रदय माझ्याही नकळत तुझ्याच नावाने धडधडतं
जणू काही दुर कुठल्यातरी कोपर्यातून मंद संगीत ऐकू येतं..
आय वाॅट टू शेअर माय ड्रीम... माय ब्रीथ,
आय वाॅट लव्ह यु अनटिल माय माऊथ बिकम विदाऊट टिथ..
आय वाॅट यु टू बिकम माय वाईफ अॅण्ड मेक ब्युटीफुल माय लाईफ. अनुराधा विल यु मेरी मी?
आणि ठळक लाल अक्षरात आय लव्ह यु चे शब्द स्क्रीनवर झळकतात. हर्ष तिच्याचसमोर गुडघ्यावर रिंग हातात धरून बसलेला असतो.. हर्षच ह्रदय जलद गतीने धडधडत असतं..
तिचं काय उत्तर असेल, काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यासाठी तो खुप एक्साईटेड आणि थोडा नव्हर्स देखिल असतो.
इतक्यातच अनुराधा धाड्कन चेअरवरून ऊठते. हातात केक कापायला आणलेला सुरा घेते आणि एकदमच हर्ष च्या गळ्याला लावत -
"तझी हिंमत कशी झाली मला प्रपोज मारण्याची? तुला माहीतेय मी कोण आहे ते?"
हर्ष आवासून पाहतच बसतो आता खरं सरप्राईज होण्याची वेळ हर्षवर आलेली असते. तरीही तो थोडी हिंमत करत -
"अनु खरंच.. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.. इट्स नाॅट अ जोक..
तुझ्या मनात काही नसेल तर तसं सांग पण सोड मला."
"सोडेन पण एका अटीवर"
कोणती अट?? चेहर्यावरचा घाम शर्टाच्या बाहीने टिपत हर्ष विचारतो..
"डोळे बंद कर"
"हं केले बंद"
विडीयोत जे जे बोललास ते आता बोलून दाखव..
"नाही! नको, मला तुझं उत्तर मिळालं" - हर्ष
"दाखव म्हणाले ना.. आणि डोळे एकदम बंद"
ओ. के.
हर्ष पुन्हा सगळं ते समोर बोलून दाखवतो. त्याचे डोळे अजूनही बंदच असतात देव जाणे उघडल्यावर काय होते ते??
इतक्यात त्याच्या गालावर अनुराधा किस करते आणि त्याच्या कानात 'आय लव्ह यू टू' चे शब्द गुंजतात.
तसा आनंदाने खाडकन तो डोळे उघडतो..
अनुराधा खट्याळपणे हसत "किती घाबरला होतास तु..चेहरा बघण्यासाखा होता तुझा.. आता कळलं कसं वाटतं ते?? मी ही असेच घाबरले होते" असं म्हणते..
तसा हर्ष उठून तिला पकडायला धावतो आणि मग तीपण त्याच्या तावडीत न सापडण्यासाठी पळत सुटते..
क्रमशः
भाग सातवा - https://www.maayboli.com/node/75176
टिप: कथेचे सर्व हक्क अबाधित.
नयना ओ नयना...... आता खरी मजा
नयना ओ नयना...... आता खरी मजा येणार....
भारीच खट्याळपणा चाललायं
भारीच खट्याळपणा चाललायं दोघांचा.. कळू दे नयनाला मग खरचं मज्जा येणार... छान अजय जी...
कथा छान सुरु आहेच ह्यात
कथा छान सुरु आहेच ह्यात प्रश्नच नाहीये पण एक प्रश्न आपसूक पडला मनात ते म्हणजे हर्षने रात्री अपरात्री ऑफिसचा खाजगी वापर केलेल्या कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज कसे मॅनेज केले !!
हा ही भाग छान जमलाय... पुढील
हा ही भाग छान जमलाय... पुढील भाग लवकर येऊ द्या
धन्यवाद, प्रविण, रूपाली,
धन्यवाद, प्रविण, रूपाली, अज्ञानी, तुषार.
अज्ञानी - तुमच्या प्रश्नांचं उत्तर पुढील भागात मिळेल..
Loved it! पुभाप्र!
Loved it! पुभाप्र!
मायबोलीवर दोन कथांची मेजवानी
मायबोलीवर दोन कथांची मेजवानी मिळतेय. मस्त होतायेत सगळेच भाग.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!
धन्यवाद ताई, धन्यवाद
धन्यवाद ताई, धन्यवाद महाश्वेता.
ही कथा पूर्ण करणार अहात का?
ही कथा पूर्ण करणार अहात का?