प्रवासातील संवाद

Submitted by अनुज गिरोल्ला on 20 June, 2020 - 10:17

प्रवासातील संवाद...

मला आठवतं साधारण पंधरा वर्षांपूरवी आपण प्रवास करताना आपल्या शेजारी कोणि व्यक्ती बसली की, संकोच वाटायचा, सुरवातीला थोडा वेळ जायचा आणि आपसुकच बोलणं चालु व्हायचं. वयाची काही मर्यादा अशी नसायची. बोलण्यातुन कधी ओळख निघायची, कधी गावं सारख़ी निघायची, गप्पा मारता मारता प्रवास कसा जायचा कळायचंच नाही. असं वाटायचं की आपण आधीच का नाही बोललो...
आपण पुन्हा त्या व्यक्ती ला कधी भेटण्याचा योग येइल किंवा नाही पण...
पण तो अल्प संवाद सुद्धा आनंद देउन जायचा, थोडक्यात काय की अनोळखि माणसाशी सुद्धा संवाद होत असायचा, विचारांची देवाण घेवाण व्हायची, कंटाळवाणा प्रवास केव्हा संपायचा कळायचंच नाही...
पुन्हा भेटणार नाही हे माहित असताना पण ; "भेटू पुन्हा" हे बोलण्यातला आनंद वेगळाच...

Science सांगतं, we all are connected each other by some frequency...
आपल्यात परमात्म्याचा अंश आहे, आपण त्याचा अंश आहोत,
पण आजच्या "stay connected" च्या जगात हे सर्व नामषेश झालंय, अनोळखि तर सोडाच पण ओळखिच्या लोकांसाठी देखिल आपण वेळ देत नाही!!
चार इंचं काच सोडून खरी अस्तितवातली लोकं पाहण्याची कुवत आज लोकांमधे नाही...
एक तर लोकांचे फोटो पहायचे किंवा स्वत: चे लोकांना दाखवायचे, आजून विक्रूत म्हणजे स्वत: चेच फोटो सतत पहायचे...
मी कसा दिसतो / कशी दिसते, मला कोण पाहतय ते चेक करत बसायचं...
सतत मुंड्या त्या मोबाइल मधे खुपसायच्या... कपाळी आठ्या ठेवायच्या आणि चिंताग्रस्तं व्हायचं रीपलाय नाही आला तर...
व्हॉटसप, ट्वीटर, फेसबुक, इन्सटाग्राम, कुठे घेउन जातय हे सर्व माणसाला...?
माणसातली माणूसकी विसरायला भाग पाडतायेत ही सगळी applications आणि उपकरणं...!!
गरजेची नक्कीच आहेत ही सर्व,पण थोडा वेळ ठेवा की बाजुला त्यांना ...
कधी स्वत: चं हार्ट बुक ओपन करा स्वत: च्याच हार्ट मधे. कोणाला सांगु नका, कोणाला दाखवू नका.
तुम्ही स्वत: पाहीलं की झालं, मग त्यात तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांच्या आठवणी ठेवा. आणि हो.. सेव्ह कराची गरज नाही, की मेमरी स्पेस ची. कारण अजून उतरु दिलं नाहिये त्याने तुम्हाला त्यात. ते बटण त्याच्याच हातात आहे.
प्रवासातला शेजारचा माणूस तर पहा, निसर्ग पहा...
खरंतर शेजारच्या माणसाशी संवाद साधायच्या आधी स्वत: शी बोला, खोटा देखावा बंद करा, म्हणजे त्याच्याशी बोलता येइल.

मोबाइल/व्हॉटसप/ फेसबुक ह्यांचा दोष अजिबात नाही...
ह्या गोष्टी आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्याकरता नाही...
सगळं करावं पण मर्यादेत राहून...

मि लिहीलेला ही मेसेज सुद्धा व्हॉटसप वरनंच वाचला जाइल पण ह्या सर्व गोष्टींचा अतिरेक टाळला गेला तर लिखाण सार्थकी लागेल.

अनुज गिरोल्ला
नाशिक.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults