अमेरीकेतील पर्यटन

Submitted by ana on 30 April, 2009 - 10:52

जुन्या मायबोलीवर अशा प्रकारचा एक धागा होता जिथे आपण अमेरीकेतील पर्यटनाविषयी माहीतीची देवाण-घेवाण करायचो. इथे तेच अपेक्षीत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला NJ च्या आसपास चार साडेचार तासावर ठीकाण हव आहे. पोर आहेत बरोबर. गुगल करणार आहेच पण माझा विश्वास लोकांच्या अनुभवावर जास्त आहे कारण इथे साइट्स वर जरा जास्तच तिखट मीठ लावुन सांगतात. प्रत्याक्षात काहीवेळा फुसका बार असतो. मे मधल्या लांब विकांताला जायचा विचार आहे. आधीच धन्यवाद.:स्मित:
परत फेड म्हणुन पानभर फोटो टाकेन देवाशप्प्थ.:डोमा:

सिक्स फ्लॅग्स, कॅम्डन अ‍ॅक्वेरियम, हर्शी पार्क, सेसमी स्ट्रीट या १ दिवसाच्या ट्रिप्स माहित असतीलच. मुलांमधे कायम हिट. जवळपस फिली एरियामधे बरेच आहे बघायला कॉन्स्टिट्युशन सेन्टर वगैरे., शिवाय आउटडोअर अ‍ॅक्टिविटीज मधे इन्टरेस्ट असेल तर, कॅम्पिन्ग करायाचे असेल तर डेलावेअर वॉटर् गॅप एरियामधे, कॅटस्किल एरियामधे KOA च्या मस्त साइट्स आहेत. आमचा फेवरेट प्रोग्राम आहे तो सुट्टीमधला! अजून लिहिते नन्तर. तसे लेक जॉर्ज पण साधारण ४- साडेचार तासावर आहे. मस्त स्पॉट आहे तो. बोटिन्ग, पॅरॅसेलिन्ग वगैरे बर्‍याच अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत . पण २ दिवस तरी हवेत तिथे.

लेक george चच चालल आहे पब्लीकच पण मीच जरा शहाणपणा करुन दुसर काही आहे का बघु वगरे. तीथे आधी जावुन आलो आहे राहीलो नाही मात्र . कॅम्पिग पण option आहे पण एक लहान पिल्लु आहे आठ महीन्यांनच.

लहान मूल असेल तर टेन्ट न वापरता KOA च्या साइट्स वर केबिन्स पण असतात. त्या तर खूप सोयीच्या असतात, बेड्स असतात, हीटिन्ग ची सुद्धा सोय असते बहुतेक केबिन्स मधे. साइट वर दूध , फॉर्म्युला इ. मिळातेच शिवाय बेसिक ग्रोसरी असते. अन या फॅमिली साइट्स असल्यामुळे तशा मेन मर्केट पासून जवळ च असतात, त्यामुळे काही लागले तर लगेच आणता येते . मोठा ग्रुप असेल तर कँपिन्ग मधे धम्माल येते एकदम. मुले तर जाम खुश असतात.

कोणी अलास्काची विंटर टूर केली आहे का?
आम्हाला अलास्काला खास "Northern Lights" बघायाला जायचे आहे. शक्य असल्यास thanksgiving च्या सुट्टीत जायचा विचार आहे.
कोणी आधि गेले असल्यास मार्गदर्शन करु शकेल का?

स्वस्त आणि मस्त ४ लोकांचा camping tent कोणता घ्यावा? भरपुर टेंट्स बद्दल माहिती वाचत आहेच पण कोणाला अनुभव असेल तर लिहा कोणता वापरता ते. फार महाग नको आहे.

आम्ही मागच्या वर्षी कॉस्टको मधून घेतला. ब्रॅण्ड घरी गेल्यावर बघून सांगतो. चांगला होता. त्याआधी वॉलमार्ट चा अनुभव एकदम बेकार.

आम्हीही कोलमन चा घेतला होता. ६ लोकांना झोपता येईल असा घेतला होता . काहीतरी $७५-८० च्य आस पास होता. वर्षातून १-२ वेळा असे २-३ वर्षे वापरला असेल, व्यवस्थित राहिला. नंतर खराब नाही झाला, पण आम्हीच वापरला नाही Happy

थँक्स फा, मै, असामी.
फारेंड, नक्की सांग. वालमार्टचा कोणता होता तेही आठवले तर सांग. बेकार का वाटला तो?
असामी, हो.. हाच पहिला येतोय amazon वर आणि फार महाग पण नाही. पहिला साधाच घ्यावा हाच विचार चालुये. फार आवड निर्माण झाली तरच घेऊ भरभक्कम.