जिंकणारी सारे डाव आज प्रेमाच्या खेळात हरली होती

Submitted by मी अनोळखी on 17 June, 2020 - 14:47

त्या दिवशी मी निःशब्द डोळ्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो
हरवलेलं तिचं हसणं शोधत होतो
तिच्या भरल्या डोळ्यात फक्त पाणी होत
भावनांना जणू तिने बंद तिजोरीत लपवल होत
न थांबणारी तिची बडबड आता मला ऐकूच येतं न्हवती
आता तरी गप्प बस ग अस ऐकणारी आज बोलतच न्हवती
हलकेच डोळ्यांवरच्या बटा सावरत घायाळ करणारी
ती आज केसांना हात ही लावतं न्हवती
मुक्त पाखरासारखी उडणारी ती आज कोणत्या कैदेत जखडली होती??
सगळ्यांना हरवणारी ती आज स्वतःच हरली होती
मोकळा श्वास घेणारी बंधनात अडकली होती
पाहता क्षणी नजरेत भरणारी आज नजर तिची अचल होती
प्रेमाने भरलेल्या तिच्यात आज प्रेमाचीच कमी होती
निस्वार्थी जगण जगताना ती मात्र रिक्त झाली होती
जिंकणारी सारे डाव आज प्रेमाच्या खेळात हरली होती...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults