गुरूघंटाल स्वामीला उचकी का लागली?

Submitted by सखा on 17 June, 2020 - 07:49

images (52).jpeg
गुरूघंटाल स्वामीचा अख्ख्या इंडियात मोठा दबदबा. एका भक्तानी दिलेल्या विमानात बसून ते देवाशी डायरेक्ट बोलतात असही लोक म्हणतात. एकदा त्यांना उचकी लागली तेव्हा साक्षात देवाने त्यांची आठवण केली होती अशी कथा पुर्ण जगात प्रसिद्ध आहे. आज पहाटे महाआरतीला महाराज म्हणाले "आपल्या शत्रूवरही प्रेम करा!"
मी म्हणालो "महाराज करोना आपला शत्रू आहे मग कस करायच मार्ग दाखवा?"
त्या क्षणापासून महाराजांना जी उचकी लागली आहे ती काही थांबतच नाही.
मला मात्र ताबडतोब भक्त मंडळातून वगळण्यात आलेले आहे आणि मी नव्या गुरूचा शोध घेत आहे.
#शॉर्टस्टोरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users