निष्ठा

Submitted by Lalitasabnis09 on 17 June, 2020 - 04:11

बाई तुझ्या निष्ठा
किती रुजल्या खोलवर .
सोसतेय अनेक जन्माचा छळ.

बाई वडाला फेऱ्या घालण्यातच
गेले तुझे अनेक जन्म.
वडाला बांधलेल्या दोऱ्यासारखी
तू गुरफटली संसारात.

बाई अत्याचार सोसून
तू उभी राहिलीस घरासाठी.
स्वतःच्या भावनांना
दिलीस तू मूठमाती.
स्वत्व जपतांना
जगतेस तू लेकरासाठी.

बाई उसळतात मनात
दुःखाच्या लहरी .
तरीही डोक्यावर बर्फ ठेऊन
हसते बिचारी.
ती ह्या मोहजाळ्यात
जगते एखाद्या भवऱ्यासारखी.
बाई तुझ्या निष्ठा
किती रुजल्या खोलवर.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults