रूखी सूखी दावत ( द्विभाषिक ग़ज़ल )

Submitted by निशिकांत on 11 June, 2020 - 23:08

( प्रसिध्द शायर आदरणीय इलाही जमादार यांच्या कांही द्विभाषिक गझला वाचून ही गझल लिहाविशी वाटली )

टिचभर खळगी भरण्यासाठी रोज करावी किती कवायत?
खून पसीनेसे है हासिल रूखी, सूखी, बासी दावत

म्हणे दीन दुबळ्यांना देतो तत्परतेने देव सावली
सवाल मेरा आज खुदासे"गयी तुम्हारी कहाँ रिसालत?"

दु:ख सांगता दुसर्‍यांना ते हलके होते म्हणे परंतू
गलियारे है उज़ाड इतने बयां करू मै किसे हक़ीकत

खळे संपले, थवे उडाले मीच सहारा माझा आहे
मरनेसे है जीना बत्तर, तनहाईसे करे बग़ावत

मला न मागे, पुढे कुणीही दिवाळखोरीमुळे सुखी मी
सवाल वरना ज़ायदादकी बनाम किसके करे वसीहत

अंधाराच्या पानांवरती आत्मवृत्त लिहिताना कळले
माहताबके एक किरनकी देख न पाया कभी नज़ाकत

अलिबाबाची गुहा गवसली आत संपदा माणिक मोती
"खुलजा सिमसिम"भूल गया मै करते बैठा सिर्फ हिफ़ाज़त

न्यायावरती आज भरवसा कसा , कुणी अन् किती करावा?
गवाह फर्ज़ी, फर्ज़ी कागज़ पेश हुई है झूठ शहादत

दोषपूर्ण ग़ज़लेसम झाले "निशिकांता"चे जीवन सारे
मस्त काफ़िया, रदीफभी है बिगड गई है कंही अलामत

वाचकांच्या सोयीसाठी उर्दू शब्दांचे अर्थ खाली देत आहे.
दावत--मेजवानी
हासिल--प्राप्त
रिसालत--देवाचे कार्य--divine mission
गलियारे-- गल्लीचे अनेक वचन
बत्तर-- वाईट
तनहाई--एकटेपण
बगावत--बंड, उठाव
बनाम-- नावाने
वसीहत--मृत्त्यूपत्र
माहताब--चांदणे
नजाकत--सौंदर्य
हिफ़ाजत--संरक्षण
फर्जी--बनावट
शहादत--पुरावा, साक्ष

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह. फारच सुंदर. प्रयोग अत्यंत यशस्वी.
"माहताब के एक किरण की देख न पाया कभी नजाकत! "
फारच सुंदर.
ह्या अशा द्वैभाषिक गजलांना अमीर कुसरो पासूनची मोठी परंपरा आहे ती नव्या पिढीचे कवी पुढे नेत आहेत हे खूपच छान आहे.

मला ही गजल अतिशय आवडली. फ़ॉर्म अतिशय व्यवस्थित साधला आहे आणि तो साधताना शब्दांची आणि अर्थाची ओढाताण झालेली नाही. ज्या गजलरसिकांच्या नजरेतून सुटली असेल त्यांच्यासाठी ती पहिल्या पानावर आणण्यासाठी हा प्रतिसाद.

<<<<<मला ही गजल अतिशय आवडली. फ़ॉर्म अतिशय व्यवस्थित साधला आहे आणि तो साधताना शब्दांची आणि अर्थाची ओढाताण झालेली नाही. ज्या गजलरसिकांच्या नजरेतून सुटली असेल त्यांच्यासाठी ती पहिल्या पानावर आणण्यासाठी हा प्रतिसाद>>>>>
मला पण अतिशय आवडली. मी पण पहिल्या पानावर आणण्यासाठी हा प्रतिसाद देत आहे.