एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग चौथा

Submitted by अजय चव्हाण on 11 June, 2020 - 12:48

भाग चौथा - सेम पिंच

इकडे नयना खूप खुश होती. आरशासमोर उभ राहून स्वतःला न्हाहळतं कुठलंतरी गाणं गुणगुणत होती. प्रेमात तर ती होतीच पण असा मोकळा वेळ आणि काल झालेल्या हर्षबरोबरच्या गप्पा
त्यामुळे आज ती जरा जास्तच खुष होती. प्रेमात असल्यावर बहुतेक असचं होत असावं. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद वाटू लागतो. त्या व्यक्तीचं जवळं असणं, त्याच्याशी बोलणं, सोबतचा प्रवास ह्यातही कमालीचा आनंद वाटतो. तिला ह्याआधी खुप वेळा वाटतं होतं त्याला त्याच्या नावाने प्रेमाने बोलवावं, त्याच्याशी खुप गप्पा माराव्यात..नेहमीसारखं त्याच्याशी बाॅससारखं न राहता एखाद्या चांगल्या मैत्रिणीसारखं वागावं. असं तिला नेहमीच वाटे पण जमत नव्हतं आणि तशी कधी संधीदेखिल आली नव्हती.
काल हिच ती संधी आहे हे उशिरा उमगून तिने ती साधली होती.
आणि ते सगळं काल तिने अनुभवलं होतं आणि त्यामूळेच आज ती खुप खुश होती..

मेरे दिल को ये क्या हो गया...
मै ना जानू कहाॅ खो गया..
क्यु लगे दिन में भी रात है ..
धुप में जैसे बरसात है.
ऐसा क्यु होता है बार बार..
क्या इस को ही केहते है प्यार. .

नयनाची रिंगटोन वाजली तशी तिने मोबाईल उचलला..

"हॅलो.. हा. बोल गौरे.."

"हलकट.. नालायक.. पुण्यात आलीस आणि मला कळवलं पण नाहीस ना?" - पलिकडून गौरी थोड्याशा रागात बोलत होती..

"अगं माझी स्विटहार्ट, तुला मी डायरेक्ट भेटून सरप्राईज देणार होते आणि तसंही मी तुला आधी सांगितलं होतं रिम्मेंबर.?
नयना समजुतीच्या सुरात म्हणाली.

"ओके, कधी भेटतेयेस मग?? - गौरी.

"आज संध्याकाळी भेटूया का मॅकडोनाल्डमध्ये?"

"ओके चालेल. बाय तु आराम कर."

"ओके सी यू देन" - नयनाने फोन ठेवला आणि परत ती स्वतःशीच गुणगुणत राहीली.

..............................................................................................................................................................................

कोथरूडच्या मॅकडोनाल्डमध्ये म्हणावी तशी इतकी गर्दी नव्हती. नयनाने आपली स्कुटी पार्किंगमध्ये लावली आणि चालत ती आतमध्ये शिरली. आज तिने कितीतरी दिवसांनी मस्त पंजाबी ड्रेस घातला होता. नेहमी शर्ट आणि ट्राऊजरवर असणारी नयना आज वेगळीच वाटत होती. खरंतरं नयना सुंदरच होती. कुठलेही कपडे तिला शोभून दिसतं पण पंजाबी ड्रेसमध्ये नयना अजुनच खुप सुंदर दिसत होती. त्यात केस मोकळे, हलकी टिकली लावलेली, बांगड्या घातलेल्या त्यामुळे जरा जास्तच मोहक आणि आकर्षक वाटत होती.

गौरीला यायला अजून वेळ होता. नयनाने मॅककॅफेतून काॅफी घेतली आणि ती एका कोपर्यातल्या टेबलावर जाऊन बसली..
काॅफीचे हळू हळू घोट घेत ती सहजच आजूबाजूला नजर फिरवत होती. इतक्यातच -

"एक्सुज मी?? कॅन आय सिट हिअर..??"

एक मस्त फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली. उजळ गोरा रंग, गोल चेहरा, मोकळे सोडलेले केस आणि हातात रेड ट्रेमध्ये चिकन मॅक बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि डायट कोक असलेली मुलगी तिला विचारत होती. नयनाने आजूबाजूला नजर फिरवली तर सगळे टेबल फार गर्दी नसली तरी फुल्ल होते. नयना चार लोकांसाठी असलेल्या टेबलवर बसलेली आणि गंमत म्हणजे त्या मुलीनेही सेम पंजाबी ड्रेस घातला होता. इतर मुलींसारखी नयना जेलस होण्यार्यातली नव्हती. तिला तिचं कुतुहूल वाटलं आणि म्हणूनच तिने तिला बसू द्यायचं ठरवलं.

"अ‍ॅक्च्युली आय अॅम वेंटीग फोर समवन बट यु कॅन सिट हिअर्." नयनाने तिला बसायला सांगितले...

"थॅन्क्यू! "असं म्हणत ती मुलगी बसली आणि डायट कोकचा घोट घेत तिनेच बोलायला सुरुवात केली.

"अरे वा! सेम ड्रेस..सेम पिंच" ती स्माईल देत बोलली.

"हो मगाशीच मी नोटीस केलं.. छान सुट होतोय तुला हा ड्रेस" नयनाने तिला काॅम्प्लिमेंट दिली.

"तुलाही छान दिसतोय. बाय द वे, हाय! माझं नाव अनुराधा जयरामन" हात पुढे करत त्या मुलीने नाव सांगितलं.

"हॅल्लो! माझं नाव नयना देशपांडे.. तु साऊथ इंडीयन आहेस? तरीही मराठी छान बोलतेस.

"हं... हो! अ‍ॅक्च्युली वडील साऊथ इंडियन आणि आई मराठी आणि त्यात मी पुण्यात राहते म्हटल्यावर मराठी यायलाच हवं ना.
आणखी एक घोट घेत ती उत्तरली..

"हो यायलाचं हवं.. काय करतेस तू? आय मिन जाॅब वैगेरे?"
नयनाने काॅफीचा रिकामा झालेला कप बाजूला ठेवत विचारलं..

"काही खासं नाही आताच एम.बी.ए. केलयं. सध्या जाॅब शोधतेय.. काॅलेजकडून प्लेसमेंट मिळालेली पण ट्रेंनिंगसाठी तीन महिने मुंबईला राहावं लागलं असतं म्हणून जाॅईन नाही केलं. तु काय करतेस? - अनुराधा.

"माझी छोटीशी फर्म आहे मुंबईत आणि आता पुण्यात अजून एक ब्रांच ओपन केलीय तर सध्या आम्हालाही काही मॅनेजमेंट ट्रेनी हवे आहेत. इफ यू थिंक सो, सोमवारी इंटरव्ह्यूला येऊ शकतेस..हे माझं कार्ड " - नयनाने पर्समधून कार्ड देत म्हटलं.

"या शुअर! पण मला कामाचा काहीच अनुभव नाहीये" नयनाच्या हातातलं कार्ड घेत अनुराधाने विचारलं..

"तु इंटरव्ह्यूला तर ये आधी मग आपण बोलू" - नयना

इतक्यातच गौरी तिथे आली. रेड कलरचा टी शर्ट, क्रिम कलरची थ्री फोर्थ, मानेपर्यंतचे थोडेसे हायलाईट केलेले केस आणि हातात रेड कलरच्या ट्रेमध्ये दोन चिकन बर्गर, एक लार्ज कोक आणि फ्रेंच फ्राईजचे दोन पाकीटं..

"हाय गर्ल्स..." असं म्हणत ती बसलीसुद्धा..

दोघीनींही जुजबी हाय हॅलो करत तिच स्वागत केलं..

"काय ग शहाणे जाम मोठी झालीस तु?? ट्रेकडे हात दाखवत हे काय? मी तुला ट्रिट देणारे होते.. तु का आणलसं?? " नयना थोडी घुश्यातच बोलली..

"रिलॅक्स नयु.. तु इतकं मोठं नविन ऑफिस उघडल्यावर तुझ्याकडुन असली चिंधी ट्रिट थोडी घेणार आहे? मोठी पार्टी हवीय मला - गौरी साॅसच पाकीट फोडत बोलली.

नंतर त्या दोघी आपल्याच गप्पांमध्ये रमत गेल्या. त्या विसरूनच गेल्या की,अनुराधाही तिथे आहे ते. एव्हाना नंतर नयनाच्या हे लक्षात आलं.

"आय अॅम साॅरी अनुराधा.. मी गप्पांच्या नादात तुझी ओळख करून द्यायला विसरलेच बघ. गौरे ही अनुराधा. आताच आमची ईथे मैत्री झाली आणि अनुराधा ही माझी खास मैत्रिण गौरी..

दोघीनींही मग एकमेकांना बघून स्मित केलं.

"अच्छा मैत्रीण होय. मला वाटलं जत्रेत हरवलेल्या बहिणीच भेटल्या की काय? सेम ड्रेस आणि केवळ ड्रेसमुळे ओळख पटली वैगेरै.." गौरी हसत हसत बोलली.

अनुराधाच खाऊन झालं होतं आणि ती जायला निघाली.

"ओके गर्ल्स आय अॅम लिव्हींग नाऊ.." चेअरवरून उठत अनुराधा म्हणाली..

" ऐ साॅरी.. तुला राग नाही आला ना?" गौरीने तिला अडवत विचारलं.

"नाही अजिबात नाही. घरी खुप काम पडलयं म्हणून निघतेय नंतर भेटूच आणि नयना मी येते सोमवारी इंटरव्ह्यूला.

गौरीचा हात सोडवत ती म्हणाली..

"ओके बाय.." - गौरी आणि नयना

"बाय गौरी.. बाय नयना.." अनुराधाने जाता जाता दोघीनाही बाय केलं..

अनुराधा गेली तशी-
"काय मग नयू ..तुझा हिरो काय म्हणातोय - गौरी तिला छेडत म्हणाली.

"बाॅसपुढे काय बोलणार बिचारा? पण एक सांगू खूप साधा आहे ग तो. तो वाट बघतोय त्याच्या ड्रीम गर्लची" नयना थोडसं उदास होत म्हणाली.

"अग मग सांग ना त्याला तुझ्या मनातलं"

"अगं असं कसं सांगू? इतकं सोप्पं नाहीये..थोडं क्लोज होऊ दे, मैत्री होऊ दे, त्याला मला नीट ओळखू दे मग सांगेन. आता लगेच सांगण बरोबर नाही वाटतं मला. तसंही ह्या गोष्टी मी व्यवस्थित प्लॅन केल्या आहेत. काल थोडासा त्याला शाॅकही दिला आहे. प्लॅननुसार सगळं झालं ना तर तोच माझ्या प्रेमात पडेल आणि स्वतःहून तो मला विचारेल."

नयनाच्या ह्या उत्तरावर गौरी आ वासून पाहतचं राहीली..

"माहतेय मला असं कुणाला कधी प्रेमात पाडता येत नाही पण मी थोडा सायकॉलॉजीचा अभ्यास केलाय. हे बघ अगोदर मी त्यांच्याशी खडूस बाॅससारखं वागत होते. काल गाडीत त्याच्याशी मी एखाद्या जुन्या मैत्रिणीसारखं वागले अर्थात मलाही आनंद वाटत होताच पण त्याला मी थोडे कन्फ्युज केलयं आणि जिथे कन्फ्युजन असतं ना त्याचा माणूस जास्त विचार करतो आणि आय अॅम डॅम शुअर तो आताही माझाच विचार करत असेल आणि माझ्याबद्दल केलेला विचारच त्याच्या मनात माझ्याविषयीची ओढ निर्माण करेल आणि हळूहळू ह्या ओढीचं मैत्रीत रूपांतर मग मैत्रीचं प्रेमात कसं रूपांतर करायचं हे मी बघते."

"अरे वाह तु तर उस्ताद निघालीस.." गौरी टाळी देत म्हणाली..

"पण एक अडचण आहे गं.. एरवी हे सगळं सोपं झालं असतं
पण इथे परिस्थिती थोडी कठीण आहे. हे बघ मी त्याची बाॅस आहे आणि म्हणूनच थोडी जवळीक निर्माण व्हायला अडचण येतेय.
आधी त्याच्या मनातली भिती जाऊ दे. थोडं माझ्याबरोबर कंफर्टेबल होऊ दे, जवळीक वाढू दे. मग पुढचं सगळं.."

"अच्छा.. अच्छा. .डोन्ट वरी.. होईल सगळं बरोबर..मी काही मदत करू का तुझ्या प्लानमध्ये.." -गौरी

"नाही सध्या तर नाही पण गरज लागली की सांगेन..
चल वाजले बघ किती.. आता निघायलं हवं.." नयना..

"ओके चल..निघूया .."

दोघी चालत पार्किंगमध्ये आल्या नयनाने जिथे स्कूटी लावली होती गौरीनेही तिची गाडी तिथेच लावली होती. दोघींनीही एकमेकांना हग केलं आणि आपआपल्या गाडीने निघाल्या.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालाय हा भाग!

अवांतर!
एक निरीक्षण आणि आगाऊ प्रश्न.
पंजाबी ड्रेसच का?? Lol

अवांतर!
एक निरीक्षण आणि आगाऊ प्रश्न....
अनुराधा प्रेमाचा तिसरा कोन ड्रीम गर्ल का ?
छान झाला हा पण भाग.

धन्यवाद अज्ञातवासी.

@निलिमा यु वेलकम आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@ तायडे - धन्यवाद. पंजाबी ड्रेसचं का?? काही नाही सहज.. काही मुली जिन्स टाॅपपेक्षा पंजाबी ड्रेसमध्ये जास्त छान दिसतात.. कॅम्पर करायचं झालं तर ऐश्वर्यालाच घे...धूम 2 मधली जास्त चांगली वाटते का? तालमधली?? अमृता रावला पण घे.. विवाहमध्ये छान वाटते का मै हूॅ ना मध्ये? हे तर माझं मत झालं पण जर वर्णन करताना पंजाबी ड्रेस वगळला तर कसं वर्णन करायचं? खालचचं वाक्य घे..

"तिने स्लीवलेस ग्रे टाॅप घातला होता? "

असा राॅमेंटीक इम्पॅक्ट येत नाही .

@धन्यवाद आबासाहेब.

@प्रविण धन्यवाद.. आता पुढचा भाग आल्यावर चौकोन -त्रिकोण सगळं क्लिअर होईल..

@धन्यवाद रूपाली - तुमच्याही कविता येऊ द्यात जरा...लिहल्या असतील पोस्ट करा..नसतील लिहल्या तर लिहा...आम्ही वाट पाहतोय..

अजयदा, तुझ्या आधीच्या कथा वाचतीये हळुहळु.. त्यात पंजाबी ड्रेस घाललेल्या मुलींच वर्णन! म्हणून सहज विचारुन बघितलं.. पण Romantic impact.. हे उत्तर आवडलं ब्वा आपल्याला.. Happy
पुढचा भाग लवकर येऊदे आता.. वाट बघतीये..

हो नक्कीच आणि तुमच्या कथेतील तसेच प्रतिसादातील पंजाबी ड्रेसच वर्णन आवडलं बरं.>>> धन्यवाद रूपाली.

धन्यवाद नौटंकी...हो पण ही भेट इंपोर्टटन्ट होती पुढील भागाला वळण देण्यासाठी..

धन्यवाद ताई ..धन्यवाद तुषार..

धन्यवाद अरिष्टनेमी .. तुमचा आयडीच नावं माझं आवडतं आहे .. अरिष्टनेमी म्हणजे नकुल ना??

धन्यवाद महाश्वेता...सरकेल कथाही.. आज पोस्ट करतो पुढचा भाग...होप सो त्यात असं वाटणार नाही...