Lockdown चा side effect

Submitted by म्हाळसा on 11 June, 2020 - 12:02

कुणी, sanitizer देता का रे ? sanitizer...
ह्या कुटूंबवत्सल स्त्रीला कोणी sanitizer देता का?

ही बाई आता sanitizer वाचून,
त्याच्या फेसावाचून,
त्याच्या बुडबुड्यां वाचून,
या खोलीतून त्या खोलीत मधे हिंडत आहे.
दिसतील ते कप्पे उचकत आहे.
कुणी, sanitizer देता का रे? sanitizer...

काय ओ दुकानदारांनो, खरच सांगते बाबांनो
हे तुफान आता थकून गेलंय,
दुकानांची प्रत्येक गल्ली, प्रत्येक मांडणी
हुडकून दमुन गेलंय,
शेवटच्या Bottle मधलं उरलं सुरलेलं काढून हे
तुफान आता पार थकलंय.

जुने पुराणे दिवस आठवत,
ओरडत, sanitizer मागत आहे,
Amazon वर पण शोधून झालंय रे,
खरं सांगते बाबांनो,
हे स्वच्छता प्रेम नडतंय रे.
हे.. बाबा.. कुणी sanitizer देता का रे? sanitizer...

या वेडीला lipstick नको,
Eyeliner नको, nailpaint नको.
हवं फक्त बाटली भरून sanitizer..
हात एकमेकांवर रगडण्यासाठी,
बोटं ३० सेकंद चोळण्यासाठी,
नखातला मळ काढण्यासाठी,
Corona चा विषाणू मारण्यासाठी,
थोडासा आमच्या सरकारांसाठी,
थोडासा दोन कारट्यांसाठी
कुणी sanitizer देता का रे? sanitizer...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचताना आधी वाटले की हे विनोदी लेखनात का?
दाहक सत्य परीस्थिती तर मांडली आहे...

पण या दोन ओळी वाचल्या आणि मग फार हसलो Happy

या वेडीला lipstick नको,
Eyeliner नको, nailpaint नको.

आतिशयोक्तीतून घडणारा विनोद तो हाच का Happy