बास झाला आता तुमचा लाड...!

Submitted by पाचपाटील on 7 June, 2020 - 17:17

१. सुरूवातीला गोंजारत गोंजारत..

''कसं काय?? सगळे घरी स्वस्थ आणि सुखी आहात ना??वा..वा.. तुम्ही आमचे मौल्यवान अॅसेट्स आहात बरं..!
ह्या ह्या ह्या..!!...आणि मग मुख्य म्हणजे सगळ्या
मनुष्यजातीच्या उद्धाराच्या प्रक्रियेला गती देणारं आपलं हे काम दुर्दैवानं ठप्प पडलंय...!
आणि हे आनंदाच्या लाटा उसळवणारं, स्वर्गीय काम
तुमच्याविना खोळंबून पडलेलं असताना तुम्ही घरी निवांत झोपा काढताय म्हणजे कमालच झाली...ह्या ह्या ह्या..!!''

अशा अर्थाच्या 'झूम' प्रस्तावनेनंतरही सुस्ताडलेले नोकरदार फक्त ह्या कुशीवरून त्या कुशीवर, दाढ्या खाजवत,
फॅन फुल्ल सोडून.
एवढ्या सुंदर ढुश्यांच्या उत्तरादाखल असले दगडी प्रतिसाद...!
काय हा करंटेपणा..!
शी.. ! शी..!
मला नाही बाई असलं पटत..!

२. मग हळूहळू कळकळीवर..

''अरे ऊठा ऊठा ...आता आपलं काही खरं नाही...आपल्याला आता ताबडतोब काहीतरी खेळ करून दाखवलाच पाहिजे त्याशिवाय कटोरा फिरवता येणार नाही.''

'झाली ह्यांची*** कटकट सुरू' म्हणत म्हणत नुकत्याच
अंथरूणात उठून बसलेल्या मरगळलेल्या नोकरदारांकडून दणकट
जांभयांना सुरुवात.

३. मग शेवटी शेवटी औकातीवर..

''बास झाला आता तुमचा लाड.
कुठं डोंगरात दडून बसलाय रे सगळे?
उद्यापास्नं गुमाsssन् कामावर येताय का कसं??''

'येस्स सर..! गुड मॉर्निंग सर..! हो सर..! हा काय आलोच सर..! तुमचा आदेश म्हणजे
देवापुढचं फूल आहे सर..!! खाली नाय पडू देणार..!'

"पुरेsss!!! ऑलरेडी लाल आहे माझी. कामाला लागा आता"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy .... _/\_

नवीन प्रतिसाद लिहा