आणि आत एक पाऊस..

Submitted by पाचपाटील on 7 June, 2020 - 13:22

हवा कुंद झालीय.
आभाळ गच्च भरून आलंय.
आणि तुझ्या विरहात,
मी कातर झालोय sss.
छ्या! काय फालतूगिरीय ही !

त्यापेक्षा
हवा बेफाम झालीय
आणि कुत्र्यांना सीझनची
चाहूल लागलीय,
असं बोला.
थेट.
मुद्द्याचं.

रिमझिम पाऊस आणि
ओल्या मातीचा सुवास.
छि: छि: छि:
हे तर अगदीच टुकार झालं.
चावून चोथा... थू:

बरं मग पावसाळी गझला,
निदान मेघमल्हार तरी??
आता मात्र हद्द झाली..!
चला फुटा इथून.

बाहेर एक पाऊस.
वेड्यासारखा.
उभा-आडवा.
रपारप.
दणादण.
आणि आत एक पाऊस
स्मूथ.
घनदाट.
ऊबदार.
कनवाळू.
मेलॅन्कोलीक.
हलका हलका

असलं काही असेल
तर सांगा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users