घालमेल

Submitted by यःकश्चित on 6 June, 2020 - 16:21

अस्वस्थ विचारांचा ना हृदयाशी ताळमेळ
विस्फोट भावनांचा की दुर्दम्य घालमेल ।। धृ ।।

उत्साह जीवनाचा आमृत्यू का टिकेल !
उद्वेग विकृतीचा की स्वीकृत घालमेल ।।१।।

कर्तव्य घटितांचे कुकर्म का समजेल !
पर्याय प्राक्तनाचे की पर्याप्त घालमेल ।।२।।

स्फटिक सूर्य कैसा तिमिरातून तरेल !
आदित्य अग्निदिव्य की निस्तेज घालमेल ।।३।।

उन्माद वैभवाचा भोग्यास का दिसेल !
संतुष्ट अंतरात्मा की आसक्त घालमेल ।।४।।

उद्गाता अस्तित्वाचा वास्तव्यास कुठे असेल !
अतर्क्य आस्तिकाचे की नास्तिक घालमेल ।।५।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users