एक स्टुपिडसी लव्हस्टोरी...

Submitted by अजय चव्हाण on 6 June, 2020 - 08:06

भाग पहिला - Love At First Sight.

"8 वाजून 20 मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आज 10 ते 15 मिनिटे उशिरा येणे अपेक्षित आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी आहोत"
अनाऊसंमेंट झाली तशी प्लॅटफाॅर्मवरच्या सर्व प्रवाशांनी "भ" ची बाराखडी म्हणत मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराला शिव्यांची लाखोली वाहली. 10-15 मिनिटे काहीतरी करायचं म्हणून उगीच मी आपला प्लॅटफाॅर्मवरच्या मुली स्कॅन करू लागलो. माझी भिरभिरती नजर अखेर नुकत्याच बांधलेल्या सरकत्या जिन्याजवळ येऊन थांबली.. स्ट्रेटनिंग केलेले मोकळे केसं, कपाळावर छोटीशी मोरपिशी रंगाची टिकली, गोरा उजळ रंग, गोल चेहरा, जांभळ्या- मोरपिशी रंगाच भन्नाट काँबिनेशन असलेला पंजाबी सूट, हातात लहान आकाराची वेलवेट पर्स आणि वार्‍याबरोबर अलगद लहरणारी हिरवी ओढणी.. बघताक्षणी इतक्या गोंधळातही माझ्या मनात -

"ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल, किसी शायर की गझल ड्रीम गर्ल..
किसी झिल का कमल ड्रीम गर्ल"

हे गाणं वाजू लागलं. सगळ कसं धुसर होत गेलं..जणू काही प्लॅटफाॅर्मवर ती आणि मीच उरलो होतो. ती निळ्या जांभळ्या धुरांतुन हलकेच उतरत आहे आणि बॅकग्राउंडला माझ्या मनातलं गाणं वाजत आहे. इतक्यात "अरे ओ भाय, चढना है ना???" मागून आवाज आला तसा मी भानावर आलो. ट्रेन प्लॅटफाॅर्मवर येऊन थांबली होती आणि मी कधी ट्रेनमध्ये येऊन चढलो हे माझे मलादेखील कळलं नाही..आज पहिल्यांदाच ट्रेनमधले धक्के सुखद वाटत होते..गोंधळ, कल्ला, गुदमवणारा घामाचा वास सगळचं भारी वाटतं होतं. love at first sight काय ते म्हणतात ना तेच झालं होत मला. हे रिआलाइज झालं तस मी स्वतःशीच जोरात ओरडलो.."ohh..yes I am in love" तसे माझ्याकडे सगळे "काय विचित्र कार्ट आहे" हया नजरेने पाहू लागले आणि माझ्या सुदैवाने नेमकी तेव्हाच "नेक्स्ट स्टेशन दादर, अगला स्टेशन दादर, पुढील स्टेशन दादर" अशी अनाऊसंमेंट झाली तसा मी स्वतः ला सावरत "चलो भाय.. दादरऽऽ दादरऽऽ" असं ओरडत उतरणार्‍यांना पुढे ढकलू लागलो. आज कुठल्यातरी वेगळयाच धुंदीत मी ऑफिसात पोहचलो.

images (3).jpeg

ऑफिसाला आल्या आल्याच साहेब तुम्हाला मॅडमनी बोलवलय. असा निरोप देऊन शिपाई निघून गेला. चला आता हिटलरच्या शिव्या खायला तयार रहा मिस्टर हर्ष कुलकर्णी स्वतःशीच मी पुटपुटलो..

"मेय आय कम इन मॅडम??"

"नयना सुधाकर देशपांडे" हया नावाचा फॅन्सी बोर्ड लावलेल्या कॅबिनच दार नाॅक करत मी विचारलं...

"येस कम ईन.."

आवाज आला तसा मी आत शिरलो...

"वाजले किती?" - पहिलाच प्रश्न

मी खाली मान घातली..

तसा तिला जोर चढला..

"घड्याळाचे सेल संपलेत? काय विचारतेय मी? वाजले किती?"

"अं..अ.. दहा वाजून पाच मिनिट" थंड आवाजात मी उत्तर दिलं...

"अर्धा तास लेट?? हे आॅफीस आहे की धर्मशाळा? वाटेल तेव्हा यायचं..इथून पुढे मला एकदाही लेट मार्क चालणार नाही."

"हं..हो मॅडम..साॅरी मॅडम" कसबसं मी उत्तर दिलं. .

"चला आता कामाला लागा" - मॅडम.

"च्यायाला हिच्या.. बघावं तेव्हा हिला मीच दिसतो.. ती अकाउंट डिपार्टमेंटमधली टवळी रोज लेट येते तिला काही नाही बोलत."
स्वतःशीच पुटपुटत मी जागेवर जाऊन बसलो...

आज काही केल्या कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा तोच चेहरा नजरेसमोर येत होता. समोरच्या पीसीवर कुठलीतरी विंडो ओपन होती आणि काय आश्चर्य समोर मला मी दिसत होतो आणि हळूच माझ्याकडे धावत येणारी 'ती'..

"था थया था थया.. ओ.. ओ..धुम तनननन धुम तनननन.
नैनों में सपना..सपनो में सजनी..सजनी पे दिल आ गया..के सजनी पे दिल आ गया"

मी जितेंद्र आणि ती श्रीदेवीच्या गेटअपमध्ये. मागून सप्तरंगी गुलाल उधळत होते. मस्त मोकळं गार्डन. मोठ्या आकारातले विणा, तबला आणि गिटार... गिटार?? गिटार कुठे होत त्या गाण्यात.. जाऊ दे...हे माझं गाणं आहे. तसाही आता जमाना बदललाय. मी स्वप्नातच रमलो होतो जणू. एव्हाना माझी श्रीदेवी जवळ आलीय. तिचा नाजुक गोरापान हात मी माझ्या हातात घेतो आणि भुकंप यावा तसा एक आवाज गडगडतो.

मि. कुलकर्णीऽऽऽऽऽऽ..

मी भानावर येऊन बघतो तर मॅडम आणि तिचा हात माझ्या हातात. पाल अंगावर पडावी तसा तिचा हात मी झटकतो.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी सुरुवात! पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
फक्त एल सूचना, टायटल मराठीत टाकलं तरी चालेल. कारण हे शब्द मराठीतही सर्रास वापरले जातात.

अज्ञा+१
मस्त सुरवात केली आहे.. पुभाप्र! Happy

धन्यवाद अज्ञातवासी .. बदल केला आहे..

धन्यवाद तायडे..

@पाफा धन्यवाद. हो असू शकतं पण प्रसंग वेगळे आहेत..

छान

आज सकाळपासून बऱ्याच दिवसांनी मायबोली वाचतेय. बऱ्याच छान स्टोरीज आल्या आहेत.
मस्त लिहिली आहे स्टोरी. अगदी डोळ्यासमोर घडणारी. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!

Chan

धन्यवाद नौटंकी, रूपाली, उर्मिला, जुई, इच्चूकाटा..

@ महाश्वेता.. धन्यवाद....अरे वा खुप दिवसांनी ... अहो वारसदार पूर्ण करा की, कधीची वाट पाहतोय..

भारीच लिहिलंय. चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. पुढील भाग लवकर प्रकाशित करा. शुभेच्छा.

सॉरी प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.
हो, वारसदार पूर्ण करायचीच आहे, पण म्हणावं तसं पुन्हा मायबोलीवर लिहिणं जमेल की नाही शंकाच आहे.
आय विल ट्राय माय बेस्ट Happy