आठशब्दकथा- ऊगीच आपलं कायपण!

Submitted by Cuty on 6 June, 2020 - 05:18

नवर्याचा मोबाईल आपटून फोडला!
जीवाला लय गारवा मिळाला !!!

तळटीपः- लाॅकडाऊनमधे वैतागलेल्या सर्व गृहिणींना समर्पित.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी..
स्वतः चा लपवून ठेवला का..?

धन्यवाद निरू, राजसी, तेजो.
माझ्या मोबाईलचा तसा कुणालाही त्रास नसल्याने आणि आता तर दोघांत एकुलता एक माझाच मोबाईल असल्याने त्याला अजिबात धोका नाही.

अभिनंदन cuty. ती मेघा धाडे नवर्याचा मोबाईल खलबत्त्यात कुटून बिग बॉस मधे आली होती, आणि जिंकली पण. अजून बिबाॅ चा तिसरा सिजन चालू व्हायचाय.
आहे, आहे तुम्हाला संधी आहे. Rofl

दंडवत ग बाई तुला! Biggrin चांगला शिमगा आहे नि काय...
("अब यह शीश ना झुके, तेरे चरणोंकी शपथ मा जगदंबे, माय भवानी" म्हणून पार तान्हाजी झाला असेल की त्याचा Wink )

रच्याकने cuty, ८ शब्दातले स्पष्टीकरण मिळाले, पण संदर्भासाठी ८०० शब्दाचा लेख आवश्यक आहे.
ये माबो जानना चाहता है, क्यो आपने ऐसा कदम उठाया.

येस येस... ये कदम क्यूं उठाया...
(कुणाचा मोबाईल असह्य्य झाला तर मी कदाचित तो प्लॅस्टीक्च्या पिशवीत टाकून ती पिशवी कणकेच्या डब्यात तळाशी पुरून टाकली असती. मग त्या व्यक्तीलाच "तूच सोफ्याखाली पाडला असशील, तू फ्लश नाही ना केलास चुकून" इ इ करत मोबाईल शोधायच्या कामाला लावलं असतं. फोडणं म्हणजे एकदम जय काली माँ... :खोखो:)

हर कहानी के पीछे एक कहानी होती है।
येऊ द्या ३ही कथा .. आम्ही वाट पाहतोय.
√मूळगोष्ट
√लेडीज वर्जन
√जेंट्स वर्जन

फोडला कशाला, दानधर्म केला असता फॅक्टरी रिसेट करून एखाद्या गरिबाला. Lol
सहा महिन्यातून एकदातरी मोबाईल रागाने आदळला जातो, त्यामुळे मोबाईल जाण्याचं दुःख काय असत हे ठाऊक आहे मला.

Vb, अज्ञातवासी, नौटंकी, पाथफाईंडर,धनुडी, सिमंतिनी, अज्ञानी,महाश्वेता,जव्हेरगंज धन्यवाद.
जमले तर एक दिवस निवांत सवडीने 'मोबाईल फोडणार्या मुलीची गोष्ट' नक्की लिहीन.

Lol
सध्या चारपाच दिवस मीच मोबाईल प्रचंड वापरत आहे. आत्ताच ही गोष्ट नवऱ्याला वाचायला दिली. आता माझा मोबाईल बंद करते नाही तर लपवून ठेवते Lol

जरी विनोदी लिखाण मध्ये लिहिलेलं असलं तरी तुम्ही खरंच असं केलं असेल तर मला नाही आवडलं (माझ्या आवडीनिवडीला विचारातंय कोण? हा प्रश्न आहेच.. तरीही). फोडण्यापेक्षा देऊन टाकायचा कोणालातरी.

धन्यवाद वावे, श्रद्धा, पियू.
जी कृती घडली ती अतिशय रागात आणि भावनेच्या भरात. आणि डोकं थंड ठेवलं तरी मग दुसर्याला कोण कशाला मोबाईल देऊन टाकेन?
आता विनोदी गोष्ट अशी की, इतके दिवस शांतपणे सांगून , नाराजी व्यक्त करून ,मग वैतागून, मग भांडून ,मग कानीकपाळी ओरडून, त्रागा करून, शेवटी स्वतःला मानसिक त्रास करून घेऊनही जो परिणाम मिळाला नाही ,तो मोबाईल फुटण्याच्या खळ्ळखट्याकने झाला. आता नवर्याला समोर उभी असलेली बायको चक्क दिसायला लागलीय आणि तिने हळू आवाजात बोललेले त्याला खणखणीत ऐकू येऊ लागलेय. याउपर आपल्या घरात काय चाललेले आहे हेही त्याला कळू लागले.

Lol भारी!

नवऱ्याचा बड्डे आला कि लेटेस्ट मोबाईल घेऊन द्या! गिफ्टची झंझट नको! Light 1

हं.. खरेतर मोबाईल तोडून चारपाच दिवस झाले आहेत. दोन्ही पार्टीज जरा शांत झाल्या आहेत. आणि अति झालं नि हसू आलं तसं होतंय आता !

मस्त केलंत यात प्रश्नच नाही!
पण एक प्रश्न पडलाय की एका फटक्यात आपटून फुटला आणि बंदही पडला?
कारण आमच्याकडे हे आपटाआपटीचे खेळ चालू राहतात. पोरेही त्यात सामील होतात. मोबाईलचे कवर वगैरे तुटतात, छिन्नविछिन्न होतात. वरच्या ग्लासचे कपचे उडतात. गेला बाजार दोन तुकडे होत बॅटरी बाहेर येत सोफ्याखाली सरपटत जाते. पण तरीही जोडल्यास जिद्दीने पुन्हा चालू होतात. नाही म्हणायला पोरांचे दोन टॅब कायमचे गंडलेत पण फोनची उपयुक्तता आजही कायम आहे.
म्हणजे तुम्ही नक्की प्रहार तरी किती जोरात केला.. कुटला वगैरे काय खलबत्त्यात घालून Proud

Pages