अभागी कुंजर

Submitted by रूपाली विशे - पाटील on 4 June, 2020 - 10:35

अभागी कुंजर

गणनायका आज पुन्हा
घडले पृथ्वीवर एक पाप
सुक्षिशित म्हणवती स्वतःला
अन् ओलांडती क्रूरतेचे माप...

क्षुधा शमविण्यासाठी करे
मी रानोमाळी भटकंती
विक्षिप्त दानव ते जणू
क्षुधेलाच समजती विकृती...

पाहुनी मुख सोंडधारी
स्मरण त्यांसी न झाले का तुझे
वंदिती तुला गजानना
फुका नाव घेऊनी माझे...

गर्भातील कोवळ्या त्या
जीवाचा काय असे दोष
स्वर्गाची करिती अभिलाषा
दुष्टांनो नाही मिळणार तुम्हां मोक्ष ...

भूत- दया नाही उरली
देवा जगाच्या पाठीवर
तडफडूनी सोडी प्राण
मी एक अभागी कुंजर...

सौ. रुपाली गणेश विशे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults