ऋतू हिरवा

Submitted by रूपाली विशे - पाटील on 4 June, 2020 - 10:33

ऋतू हिरवा

आनंदघन ते नभी दाटती
हर्षित मयूर जे पीसे फुलवती
अन् उतावीळ ते थेंब वर्षाचे
तप्त धरतीस गळा भेटती...

भूमातेच्या गर्भामधूनी शांत
बीजांना अंकूर फुटती
लेवूनी सोनेरी तेज रवीचे
हरित तृण ते आनंदी डोलती...

सरिता हसत खळाळती अन्
डोंगर- कपारी कोसळती प्रपात
तुषार झेलूनी माथ्यावरती
तृषांत वनराईचे चित्त होई शांत...

जेष्ठ अन् आषाढ मास
असती तूझे प्रिय सुपूत्र
श्रावण जणू भासे आम्हांस
आमुचा मनमोहक मित्र...

बेधुंद सरींचा हा वर्षाव
बेभान करि तप्त जीवा
हुंकार उमटे ह्दयातुनी
जीवलग जणू हा ऋतू हिरवा...

सौ. रूपाली गणेश विशे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप सुंदर रचना..

शिर्षकावरून मला आशाजींचं गाणं "ऋतु हिरवा " हे गाणं आठवलं..