'निसर्ग' वादळ

Submitted by मामी on 3 June, 2020 - 02:59

आज अलिबाग, मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवरील इतर ठिकाणी येऊ घातलेल्या 'निसर्ग' वादळासंबंधी चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्रीवादळ आणि अतिवृष्टी मुळे उद्भवणाऱ्या आणीबाणी सदृश्य परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरेल असे, आपापल्या घरी तयार करून ठेवता येईल असे किट

टॉर्च आणि त्याकरता लागणाऱ्या बॅटरीज,
मेणबत्त्या,
प्रथमोपचार किट (परिपूर्ण असल्याची खात्री करावी),
वॉटरप्रूफ आवरणात ठेवलेल्या काडेपेट्या,
मोबाईल चार्जर आणि असेल तर चार्ज केलेली पॉवर बँक,
बॅटरीवर चालणारे रेडिओ,
टिकाऊ अन्न पदार्थ,
पिण्यायोग्य पाण्याने भरलेल्या बाटल्या,
चाकू / स्क्रू ड्राइवर / स्विस नाईफ सारखी छोटी हत्यारं,
वैयक्तिक स्वच्छता वस्तू आणि प्रसाधनगृहांचा पुरवठा, (साबण टूथपेस्ट ओडोमॉस वगैरे),
आपत्कालीन संपर्कांची यादी,
रद्दी / टॉयलेट / टिश्यू पेपर, वॉटरप्रूफ बॅगमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी बदलण्याकरता लागणारे कपडे,  
वॉटर प्रूफ आवरणात ठेवलेल्या विमा, आधार कार्ड / पासपोर्ट आणि मेडिकल प्रिस्क्रिप्शन यासारख्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या प्रती,

शक्यतो सर्व गोष्टी एकाच मोठ्या बॅगेत भरण्याऐवजी प्रत्येकाला उचलता येईल असे सुटसुटीत वेगवेगळे डाग करणे उपयुक्त.
कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहूया.

जुनच्या महिन्यातील गेल्या १२० वर्षांतील पहिलं वादळ असं सांगितलं जात आहे.

माझ्या आईवडिलांच्या आठवणीत एक १९५९ साली झालेलं मोठं वादळ आहे. ते दोघेही त्यावेळी १०-११ वर्षांचे असतील. पण वडिलांच्या भिवंडीच्या आणि आईच्या दादरच्या आठवणीत खूप प्रचंड प्रमाणावर झाडं पडलेली.

आई म्हणाली की त्या वादळात दादर परिसरातली अनेक बकुळीची झाडं पडली. दोन-तीन दिवस वादळ सुरू होतं. तीन दिवसांनंतर ती आजूबाजूला फिरून आली होती त्यात ही झाडं पडलेली तिनं पाहिली होती.

पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नाही. अनुभव मिळू ही नये ही प्रार्थना.

पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नाही. अनुभव मिळू ही नये ही प्रार्थना. >> खरंय

मुंबईवरून तरी विशेष काही न घडवता पुढे सरकलं वादळ.. सुटलो!

बाकी ठिकाणी देखिल फार कामगिरी न दाखवत काढता पाय घ्यावा निसर्गने.

वारा आहे जरा जोरात पण यापेक्षा जास्त वारा आम्ही पावसाळ्यात अनुभवत असतो. ढगाळ आहे पण पाऊसही काही फार नाही पडला. आता तर नाहीच आहे. समुद्रात लाटादेखिल नेहमीसारख्याच दिसत आहेत.

मुंबईवरून तरी विशेष काही न घडवता पुढे सरकलं वादळ.. सुटलो!>>> मुंबईत अजून आलंच नाही. 3.30-4 ला येणार आहे तिकडे.

उरणवरुन डोंबिवलीमार्गे धुळ्यात वादळ जाणार आहे, अ‍ॅज पर एबीपी माझा. वादळापुर्वीची शांतता संपून आता वाऱ्याचा जोर वाढू लागला आहे.

मुंबईवरून तरी विशेष काही न घडवता पुढे सरकलं वादळ.. सुटलो! >>> आता उत्तर महाराष्ट्र दिशेने सरकलं.

मुंबईचा धोका अजून टळलेला नाही असं परत एबीपी माझा सांगतेय. मगाशी दुसरंच सांगत होते.

इथे पाऊस पडतोय, मगाशी जोर जरा जास्त होता.

Mumbai chya pudhe sarkale ashi abp mazachi news ahe. महापौर पण हेच सांगत आहेत.

चक्री वादळ आणि जोराचा वारा ह्या मध्ये फरक आहे.
चक्री वादळा त मध्ये हवेची पोकळी निर्माण होवून सर्व वस्तू त्या मध्ये घेचल्या जातात आणि ते गोलाकार फिरत असते.
चक्री वादळ जमिनी वर कुठेच (,महाराष्ट्रात ) आले नाही.
फक्त काही ठिकाणी नेहमी पेक्षा थोडी जास्त हवा होती.
मुंबई मध्ये समुद्रात थोडी पण हालचाल दिसली नाही रोजच्या सारखा मस्त पैकी तो शांत होता.

जेव्हा असं चक्रीवादळ येतं तेव्हा ते जोरात यावं असं माझं मत आहे. जेणेकरून लोकांना एक भीतीयुक्त आनंद उपभोगता यावा. घराची कौलं छपरं उडण्याइतपात या वादळाची क्षमता असावी. त्याच्यापालिकडे जाऊन घरं पडणे, जीवितहानी वैगरे होऊ नये. खालील फोटो आमच्या घराचे छप्पर उडालेला आहे.
IMG-20200603-WA0014.jpg

हा कुठला फोटो बोकलत? गोरेगावजवळ का?
घरचे सगळे ठीक ना?
श्रीवर्धनमधले कुठलेच फोन लागत नाहीत.

Pages