बाप

Submitted by तुषार विष्णू खांबल on 2 June, 2020 - 05:03

बाप
शब्दांकन : तुषार खांबल
(चाल : हंबरून वासराला चाटते जवा गाय)

कौतुकाची पाठीवर पडते जेव्हा थाप
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप

कष्ट घेतले त्याने आम्हा मोठ्ठ करताना
ओरडायचा शिस्तीसाठी उठता बसताना
ऑफिसात शिस्तीमुळे पडते जेव्हा छाप
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप

माझ्यापेक्षा बहिणेचे त्याला कौतुक
तिला कोणी बोललं तरी व्हायचा भावुक
ढसाढसा रडला जेव्हा ओलांडले माप
तेव्हा मला मापामध्ये दिसतो माझा बाप

आठवेल बाप तो ह्या जगात नसताना
कडकडून भेटा त्याला समोर दिसताना
चरणी ठेवा माथा त्याच्या धुवून जातील पाप
प्रत्येकाचा देव म्हणजे असतो त्याचा बाप

कौतुकाची पाठीवर पडते जेव्हा थाप
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप

Group content visibility: 
Use group defaults