समांतर !

Submitted by Swati Karve on 1 June, 2020 - 08:29

समांतर !

अगदी सुरवाती पासून, नक्की कुठे आणि काय चुकत गेलं ते कळलंच नाही , त्यालाही आणि मलाही,
एकाच छताखाली राहत असूनही, जीव ओवाळून टाकण्या एवढं जोडीदारावरचं प्रेम काय असतं,
कधी कळलंच नाही त्यालाही आणि मलाही.

कर्तव्यबुद्धीने आपपल्या भूमिका अगदी चोख पणे पार पडण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही दोघंही,
पण कर्तव्या पलीकडची नात्यातली तीव्र ओढ कधी जाणवलीच नाही , त्यालाही आणि मलाही.

रोजचं आयुष्य, नोकरी, पै पाहूणे, मुलाचे हट्ट, सगळं व्यवस्थित निभावत असतो आम्ही दोघंही,
पण एकमेकांचा आधार होणं, काळजी घेणं, काळजी करणं, कधी जमलंच नाही, त्यालाही आणि मला ही.

जोडीदार, नात्यांचा गोतावळा, सारं असुनही भयाण एकाकीपण सतत जाळत असतं त्यालाही आणि मलाही,
कोरडेपणानि ओथंबलेल हे नातं, तोडून टाकायचा म्हंटलं तरी तोडून टाकणं ही जमत नाही त्यालाही आणि मलाही.

दैवाने बांधलेली ही विचित्र गाठ, आमच्या नात्याचे हे अनाकलनीय कोडे,
किती ही प्रयत्न केला तरी सोडवता येत नाही, त्यालाही आणि मलाही,
कधीही न जुळणाऱ्या आमच्या समांतर वाटांतून,
निर्विकार पणे करत असलेल्या या प्रवासाची,
आता सवय झालीये, त्यालाही आणि मलाही.

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान!!.. बहुतेक विवाहितांचा हाच प्रोब्लेम असतो..

त्या भावना आणि ती घुसमट अगदी बरोबर मांडलीत तुम्ही...