कविता: लॉकडाउन मध्ये भांड्यांचे मनोगत

Submitted by रजनी भागवत on 30 May, 2020 - 17:12

जेवणानंतर अक्षयपत्रात(बेसिन)जमलेल्या भांडयानी केला एकच गलका.....
थोडीशी थकून मी म्हणाले घेऊ द्या मला जरासा डुलका.

माझे म्हणणे ऐकून त्यांना आले खदखदून हसू
भांडी म्हणाली जा ग बाई जा तुझ्या कामाचा पाढा आमच्यापुढं नको वाचूस.

म्हातारीच्या गोष्टीप्रमाणे मी मात्र पुटपुटले ,डुलका घेते, फ्रेश होतें, नंतर चहाची भांडी वाढवून तुम्हा सगळ्यांचा समाचार घेते.

ताट -वाटी, कप-बशी आणि इतर पात्रांनी केली कुजबुज,जावू द्या रे तिला आपण करू आपले हितगुज.

एरव्ही एवढ्या संख्येने आपण तरी केव्हा भेटणार
कप-बशी,ताट-वाटी,चमचेच काय ते नळाखाली विहार करणार.

आताशा आपल्याला जरा अच्छे दिन आलेत,
ठेवणीतल्या भांडयानाही वारंवार पाण्याचे दर्शन झाले.

खमंग आणि रुचकर पदार्थांनी सर्व पात्रे सुखावले,
माणसांचे माहीत नाही पण लॉकडाऊन चे असे हे फायदे आम्हा भांड्यांच्या नशिबी आले.

रजनी भागवत

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users