काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी

Submitted by Sanjeev Washikar on 28 May, 2020 - 02:58

काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .(अठ्वणीतील काश्मीर)
मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा. अशांती व सर्व कांही , सद्य परिस्थितीत सर्व सामान्य माणसाला काश्मीर बद्दल या पलीकडे जाऊन कोणतीही माहिती असेल असे मला वाटत नाही . अर्थात हे माझे वैक्तिक मत आहे.
पौराणिक कथे नुसार संस्कृत भाषेत "का" म्हणजे पाणी व "शमीरा" म्हणजे सुकवलेला असा अर्थ होतो .ऋषी कश्यप यांनी बारमुला (वराह-मुला) इथे एक प्रचंड मोठ्या तळ्याच्या बाजूला छेद देऊन ते प्रवाहित केले व आपल्या शिष्य गणाला व विद्वान लोकांना तिथे राहण्याची विनंती केली . हा नवीन तयार झालेला भू भाग एक सुपीक माती आणि समशीतोष्ण हवामाना मुळे, तांदूळ, भाज्या आणि सर्व प्रकारचे फळे याने समृद्ध आहे, आणि रेशीम व केशर तयार करण्याच्या गुणवत्तेसाठी हि प्रसिद्ध आहे. काश्मीर इतिहासपूर्व कालखंडात येतो , तो कांही काळ स्वतंत्र होता, परंतु कांही काळ उत्तरे कडील बॅक्टरीया,टारटेरी, तिबेट आणि इतर डोंगराळ प्रदेशांच्या आक्रमकांनी परागंदा केला होता . दक्षिणेकडे सिंधु व्हॅली आणि गंगा खोऱ्या पर्यंत त्यांचे वास्तव्य होते.
थोडक्यात याच संस्कृती मधील पाणिनी ज्यांच्या "अष्टाध्यायी" ह्या जगातील सर्व प्रथम व्याकरणाचा सर्वात वैज्ञानिक व निर्दोष ग्रंथ मानला जातो .इथुनच पतंजली जानी मानव धर्मासाठी योग सामर्थ्याची भेट दिली .सारंगदेव ज्यांना हिंदुस्तानी व कर्नाटकी संगीताचे भीष्म पितामह मानले जातात .आचार्य अभिनव गुप्त हे सर्व काळातील विद्वान आहेत कि ज्यांनी ४६ साहित्यिक अभिजात लिखाण केले आहे कि ज्या मध्ये अभिनव भारती हे समाविष्ट आहे .त्यांची जगातील ८० विद्यापीठात "रास तत्वे " ( रास) शिकवली जातात . काश्मीर हे खऱ्या अर्थाने सरस्वतीचे मुख्य निवास स्थान समजले जाते म्हणून त्याला"शारदापीठ " असे हि संबोधित केले जाते . पूर्वी विद्यार्थी आपला ज्ञान भाग शिकून काशी मधून उत्तीर्ण होत असे व त्या नंतर तो उच्चं शिक्षण साठी काश्मीरच्या दिशेने आपली पाऊले उचलत असे .बहुतेक सर्वच संस्कृत साहित्याचा उगम हा काश्मीर मधून झाला आहे . संस्कृत कवी कलहंस यांनी १२ व्या शतक मध्ये लिहलेला , सम्राट राजा ललितादित्य यांच्यावर राजतरागिणी नावाचं ग्रंथ खूपच प्रशिध्द आहे . आठव्या शतकातील सम्राट राजा ललितादित्य हा इतका पराक्रमी होता कि त्यांचे साम्राज्य उत्तरेस कॅस्पियन समुद्रा पासून ते दक्षिणेत गोदावरीच्या पात्रा पर्यंत पसरलेले होते,कि ज्या मध्ये आसामचा, जे पूर्वेस आहे ,याचा हि समावेश होता .किती भारतीय लोंकाना या पराक्रमी सम्रांटाचे नाव ठाऊक आहे? , किती लोकांना माहित आहे कि श्रीनगरची स्थापना सम्राट अशोकाने केली आहे . काश्मिरी साधू महायान याने बौद्ध धर्माचा प्रसार मध्य आशिया ,चीन व जपान मध्ये केला होता .
काश्मीर मधील हिंदू लोकांना पंडित या नावाने संभोधिले जाते. अगदी तुकोबारायांच्या फेट्या प्रमाणे हे लोक डोक्याला फेटा बांधतात.पण ह्याच पंडीत लोकांना आपल्याच देशात २००९ पासून काश्मीर मधून हाकलून देण्यात आले.किती दुर्दैवी गोष्ट म्ह्णावी लागेल. महाराष्ट्रातील कुरोड्या हा पारंपारिक ( तळलेल्या तांदळाच्या गोल शेवया सारखा दिसणारा ) प्रकार मी तिथे अनुभवाला आहे . भारतात सर्वात जास्त संस्कृत भाषा आपल्याला काश्मिरी भाषेत सापडेल . त्र , ज्ञा, ऋ, या सारखे मराठीतील शब्द काश्मिरी भाषेत हि आढळतात . "कुलूप " हा शब्द म्हणणारे भारतिय कदाचित आपण मराठी किव्हा काश्मिरी दोघेच आहोत .
काश्मीर हा कांही जमिनीचा एक निर्जीव तुकडा नसून भारतीय संस्कृतीची अनेक तथ्ये सांगणारा इतिहास आहे . भारता मधील नवीन येणाऱ्या पिढीला हा इतिहास आवर्जून सांगितला पाहिजे . तो त्यांच्या पाठय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे .इंग्रजांनी तयार केलेला इतिहास ज्या मध्ये आमचा मूळ इतिहास संपवणे व प्रत्येक भारतीयाला मना मध्ये लाज उत्पन्न करणे हीच त्यांची रचना होती .स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी देखील ह्याच गोष्टी आपण पुन्हा करीत आहोत . पण काश्मीर असा एक मोठा खजिना आहे कि ज्या मधून खरोखरच आपली प्राचीन भारतिय सभ्यता ,संस्कृती बाहेर पडेल व खऱ्या अर्थाने तो भारताचा अविभाज्य भाग असेल .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan

आनुजी, हा नारिंगी रंगाचा फोटो आहे,तो नसीम गार्डन चा आहे. बादशहा जहांगीर याने आपली पत्नी नसीम हिच्या साठी घोडसवारी साठी बनवला होता. हे सर्व चिनार चे वृक्ष इराण हून आणले होते . इराणी भाषेत चिनार म्हणजे आग. डिसेंबर मध्ये हा लाल रंग आग लागल्या सारखा दिसतो. काश्मीर भारतात आल्यावर इथे मिलेटरीचे ब्यारेक होते व नंतर आमचे कॉलेज. याला आम्ही ओल्ड कॅम्पस असे म्हणत असू. हा काश्मीर युनिव्हर्सिटीचा मागील भाग येतो.

वाशीकर उत्तम लिखाण. तुमचे काश्मीरमधील अनुभव वाचायला आवडतील. लिहीत रहा.

संस्कृत कवी कलहंस यांनी १२ व्या शतक मध्ये लिहलेला , सम्राट राजा ललितादित्य यांच्यावर राजतरागिणी नावाचं ग्रंथ खूपच प्रशिध्द आहे . >>>

कलहंस नाव आहे की कल्हण? आत्तापर्यंत मी कल्हण असेच वाचले आणि ऐकले आहे.
आणि राजतरंगिणी हा ग्रंथ फक्त ललितादित्य मुक्तापीड याच्यावर नसून, काश्मीरमधील अनेक राजांचा इतिहास/बखर आहे. राजतरंगिणीचा शब्दश: अर्थ राजांचा प्रवाह.

थोडे अवांतर:
रणजित पंडीत (संस्कृत पंडीत व स्वातंत्र्यसैनीक, विजयालक्ष्मी पंडीत यांचे पती) यांनी या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. त्यांचे सासरे मोतीलाल नेहरू यांना हा ग्रंथ वाचायचा होता आणि त्यांना संस्कृत येत नव्हते. याला जवाहरलाल यांनी प्रस्तावना लिहीली आहे. त्या ग्रंथाचे मराठीमध्ये भाषांतर अरुणा ढेरे व प्रशांत तळणीकर यांनी केले आहे.

माझे मन, आपल्या कडून खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. नेहर ह्या शब्दाचा काश्मीरी भाषेत अर्थ होतो तळे. पंडित नेहरू यांचे वंशज हे त्या तलावाच्या समोर राहात होते, या वरून त्यांचे पंडीत ऐवजी नेहरू असे नामकरण करण्यात आले.मी हा तलाव पाहिला आहे. या तलावात पुर्ण पणे लाल रंगाचे मासे आहेत. गावाचे मुळ नाव "Mattan" असे आहे. या गावाचे आणखीन एक वैशिष्ठ म्हणजे लोकांच्या जुन्या वंशावळी सांभाळून ठेवणे व कुणी विचारले तर तात्काळ सांगणे. मध्यंतरी इथे झालेल्या अतिरेकी हल्यात ह्या सर्व जुन्या कागद पत्रंचा विध्वंस करण्यात आला.

या मटन गावाबद्दल आचार्य अत्रे यांनी लिहिलं आहे.मटन मार्तंड मंदिर वगैरे.सहज आठवलं.
आम्हाला आठवी की केव्हा तरी धडा होता.

मस्त लेख! अजून वाचायला आवडेल.

फेबु वर 'द हिमालयन क्लब' हा गृप जॉईन करा. अप्रतीम फोटोज टाकतात रोज.
यात काही गिलगिट-बाल्टिस्तान (पाकव्याप्त काश्मीर) चे फोटोज सुद्धा आहेत. अक्षरशः स्वर्गीय फोटोज/ लोकेशन्स आहेत. हळहळ वाटते की आपण तिथे भेट देऊ शकत नाही याची. असो.

या मटन गावाबद्दल आचार्य अत्रे यांनी लिहिलं आहे.मटन मार्तंड मंदिर वगैरे.>>>

मी_अनू : आम्हालाही होता तो धडा.

वाशीकर सांगताहेत ते तळं आणि गाव मट्टन (हा बहुतेक मार्तंडचा अपभ्रंश आहे) पाहीलंय. तिथेही एक सूर्यमंदीर आहे जिथे रोज पूजाअर्चा होते.
आचार्य अत्रे यांनी वर्णन केलेले मार्तंड सूर्यमंदीर मात्र हे नव्हे. ते सूर्यमंदीर जवळच आहे. पण फारशी माहिती नव्हती कुणाला. त्यामुळे पाहता आले नाही. आणि पर्यटक फारसे जात नव्हते.

हैदर चित्रपटातल्या बिस्मील गाण्याचं चित्रीकरण तिथे झाल्यामुळे आता ते पर्यटकांच्या रडारवर आलंय. हे अप्रतिम सूर्यमंदीर सम्राट ललितादित्याने घडवलंय.

शारदापीठाची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती. त्याचे आवार (तत्कालीन विश्वविद्यालयाचे अवशेष) पाकव्याप्त काश्मीरमधे आहे. या नितांतसुंदर प्रदेशाला अजूनतरी तिथे शारदा खोरे म्हणतात.

हा लेख भाषांतर करून लिहिलाय का? भाषेतील सहजपणा नाहीये. वाक्यरचना करताना दमछाक झालेली वाटतेय.

उदा.
>>>काश्मीर इतिहासपूर्व कालखंडात येतो , तो कांही काळ स्वतंत्र होता, परंतु कांही काळ उत्तरे कडील बॅक्टरीया,टारटेरी, तिबेट आणि इतर डोंगराळ प्रदेशांच्या आक्रमकांनी परागंदा केला होता .

>>>आचार्य अभिनव गुप्त हे सर्व काळातील विद्वान आहेत कि ज्यांनी ४६ साहित्यिक अभिजात लिखाण केले आहे कि ज्या मध्ये अभिनव भारती हे समाविष्ट आहे .

>>>इंग्रजांनी तयार केलेला इतिहास ज्या मध्ये आमचा मूळ इतिहास संपवणे व प्रत्येक भारतीयाला मना मध्ये लाज उत्पन्न करणे हीच त्यांची रचना होती .

बहुतेक मी लेख संक्षिप्त स्वरुपात लीहतो. आपण अनुभवलेल्या आठवणी, मुळ लिखीत इतिहास याचा मेळ घालताना माझी थोडी दमछाक झाली आहे हे सत्य मी नाकारत नाही. या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या बद्दल धन्यवाद.

चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यात आपण जर कोणते लेख/पुस्तकं संदर्भ म्हणून वापरले असतील तर किमान त्याची नावे लेखाखाली दिलीत तर बरं होईल.
बाकी तुमचे वैयक्तिक अनुभव वाचायला उत्सुक आहे. श्रीनगरचं कॉलेज, तिथे राहताना आलेले भलेबुरे अनुभव याविषयी जरूर लिहा अशी विनंती!
योकु +११
पाकव्याप्त काश्मीर इतकं सुंदर आहे! डॉनच्या एका पुरवणीत तिथले फोटो पाहून अक्षरशः खात्री पटली - अगर फिरदौस बर रूह ए जमीं अस्त हमीन अस्तो हमीन अस्तो हमीन अस्त!

अनुभव आणि आठवणी लिहा.
माबोवर काश्मीरवर फारसे वाचल्याचे आठवत नाही. चला माहौल बनवूया.

माहिती सुरेख! मलातरी माहित नव्हते पण वर म्हटल्याप्रमाणे, क्रुपया सन्दर्भ द्यावा. तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

माझ्या वरील लेखा साठी मी श्री .बी.यल.कौल यांच्या लेखातील कांही टिपण्या व संदर्भ वापरलेले आहेत . हा मूळ लेख इंग्रजी मधून आहे व मी तो एका व्हाट्सअँप ग्रुपवर वाचला होता . प्रथम लेखात लोकांना काश्मीरचा इतिहासाची अगदी थोडक्यात माहिती करून देऊन मग माझे पाच वर्षांतील सर्व क्षेत्रातील म्हणजे राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक अनुभव सांगणे, लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचा माझा एक प्रयन्त होता .काश्मीरचा सविस्तर इतिहास सांगण्या इतका माझा अभ्यास हि नाही हे मी मान्य करतो . लेखाचे वाचकही आवर्जून मला हेच सांगतात कि "तुम्ही स्वतःचे अनुभव लिहा ,तेच ऐकण्यात आम्हाला बरे वाटेल ". काश्मीरचा इतिहास जाणून घेण्या साठी अनेक पुस्तके (अगदी पाचहजार वर्षाचा इतिहास सांगणारी ) बाजारात उपलब्ध आहेत .पुढील लेखा साठी मी कांही सुंदर व दुर्मिळ फोटो देखी उपलब्ध करून ठेवले होते ते सदर धाग्यात टाकावेत कि नको या बाबत देखील मी साशंक आहे .
मी जिज्ञासा ,ऋन्मेss ष, अथेना यांनी दिलेल्या प्रोत्साहना (हौसला अफ़जाई ) बद्दल त्यांना धन्यवाद देतो .

तुमचे वैयक्तिक अनुभव, तिथल्या मित्रमैत्रिणी यांबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. नक्की लिहा.

नवीन Submitted by वावे on 30 May, 2020 - 17:39

>>>>१००