ऑनलाइन शिक्षणाची सद्यस्थिती

Submitted by Sharadg on 26 May, 2020 - 12:33

टीचिंगची सद्यस्थिती
माझा मुलगा दहावीत असल्याने गेल्या जुलैपासून Byju's लर्निंग ॲप वाले आमच्या ऑनलाईन लर्निंग ॲप्सचे सभासदत्व घ्या म्हणून मागे लागले होते. पण किंमत दहा-बारा हजार रुपये असल्याने व तसे बरेच महाग वाटल्याने आणि तसाही तसेच ऑनलाइन टिचिंग वरती फारसा विश्वास नसल्याने, मी तिकडे दुर्लक्ष केले होते. पण 22 मार्चपासून करोना व्हायरसच्या साथीमुळे सर्व शाळा व महाविद्यालये बंद पडली. दहावीचा शेवटचा पेपर रद्द झाल्याने व सरासरी गुण देऊन भूगोलाच्या विषयात पास करण्याचे ठरवल्याने, बऱ्याच शिकवणी वर्गांनी ऑन ्लाईन क्लासेस चालु केले. तसेच प्राध्यापकी हा माझा पेशा असल्याने, एक पालक म्हणून गेल्या महिन्याभरात आलेले अनुभव शेअर करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

पहिलं म्हणजे अधिक कधीही न ऐकलेली झूम, फ्री कॉन्फरन्स कॉल, तसेच गूगल क्लासरूम आणि गुगल मीटिंग इत्यादी सॉफ्टवेअर्स, आपल्याला आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाउनलोड करून घ्यावी लागली. या आधी आपण आपल्या मोबाईलचा वापर आपल्या पाल्याने कमीत कमी करावा म्हणून प्रयत्न करत होतो, पण पाचवीपासून पुढे जवळपास सर्व शाळांनी संगणक वा मोबाईल आधारीत ऑनलाइन टिचिंग सुरू केल्यामुळे आता आपला मोबाईल आपला न राहता, आपल्याला आपल्या मुलांच्या ताब्यात देणे भाग पडले.
या ज्या अकरावी-बारावीच्या ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्यातील बरेच शिक्षक आपला दुपारचा आणि पुर्ण दिवसाचा वेळ कुटुंबासाठी देण्यात यावा, म्हणून ऑनलाइन शिकवणी वर्गाचा मारा झूम किंवा इतर aaps वरती सकाळी 7 पासून चालू करतात. त्यामुळे सध्याची माझी सकाळही लवकर सुरू होते. माझ्या मुलाचा सकाळी सात वाजता पहिला तास असतो. रात्री टी. व्ही., मोबाईल गेम्स खेळताना बऱ्याच वेळेस तो उशिरा झोपतो व त्यामुळे कधीकधी सकाळी सात वाजता उठू शकत नाही. मात्र झूम वरच्या तासिकेसाठी लॉग इन आयडी आणि पासवर्ड आधीच सांगितलेला असल्यामुळे नंतर मी ती माझी जबाबदारी समजून चिरंजिवांच्या ऐवजी मीच लॉग इन करतो . चिरंजीव सव्वा सात पर्यंत उठतात आणि डोळे चोळत चोळतच लेक्चरला येऊन बसतात. बरं अकॅडमी वाले शिक्षक सुद्धा आपल्या घरातूनच शिकवत असल्यामुळे, त्यांना अकॅडमी मधल्या तंत्रज्ञानाचा व सुविधांचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे बरेच जण आपला दीड जीबी किंवा दोन जीबी जो काय असेल तो डाटा पॅक वापरून, आपल्या सॅमसंग, रेड मी इत्यादी हॅन्ड सेंटचा कॅमेरा व मायक्रोफोन वापरून लेक्चर रेकॉर्ड करत असतात. त्यासाठी कमीत कमी डेटा पॅक वापरला जावा, व्यवस्थित प्रक्षेपण दर्जा मिळावा व खर्च कमी यावा, म्हणून कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ इनपुट सुद्धा बंद करायला सांगितलेला असतो. एखादा विद्यार्थी तासिकेला बसला आहे किंवा नाही, हे केवळ त्यांना त्यांच्या सहभागी विद्यार्थ्यांच्या यादी द्वारे कळत असते. त्यामुळे खरोखर मोबाईल समोर नक्की विद्यार्थी कि अन्य कोणी आहे, तसेच विडिओ खरोखर लक्षपूर्वक पहिला जातोय कि मुलगा लेक्चर चालू ठेवून इतर बॅकग्राऊंडला गाणी ऐकतोय किंवा इंस्टाग्राम किंवा व्हाट्सअप किंवा टिक टॉक व्हिडिओ करतोय हे कळू शकत नाही.

या संगणकाधारित तासिकेचे चित्रीकरण, हे बरेच शिक्षक उपलब्ध असलेल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून करत असल्यामुळे, बऱ्याचदा ते एखादा मोबाईल स्टॅन्ड वापरून कॅमेरा एका जागी स्थिर करून ठेवतात व त्यानुसार शिकवले जाते. त्यामुळे होते कसे कि, शिक्षक फळ्यावर ते संपूर्ण दिसावे म्हणून फक्त फळ्याच्या पृष्ठभागावर वरती कॅमेरा केंद्रित करतात व त्यामुळे शिक्षक मुलांना दिसत नाहीत. जर कॅमेऱ्याचा फोकस चुकलेला असेल तर शिक्षकांची पाठ मुलांना दिसते व अर्धा फळा दिसेनासा होतो. त्यामुळे शिक्षकांना फळ्यावरील गोष्टी परत लिहून घेण्यासाठी मुलांना जास्तीचा वेळ द्यावा लागतो. काही शिक्षक हे पूर्णवेळ कॅमेऱ्याकडे पाठ वळवून फक्त फळ्यावर लिहीत जातात व तेच मुलांनी आपल्या वहीमध्ये उतरवून काढणे हे त्यांना अपेक्षित असते. शिकवण्याच्या या पध्दतीमधील मुख्य अडचण अशी आहे की, यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये परस्पर संवाद होत नाही, जो आपल्या नेहमीच्या खडू-फळा पध्दतीत वारंवार होत असतो. नेहमीच्या पध्दतीत शिक्षक एखादे गणित किंवा एखादी संकल्पना समजावून सांगण्यासाठी काही प्रश्न विचारतात व मुलांच्या उत्तराची वाट पाहून अर्धवट किंवा अपूर्ण उत्तरे पूर्ण करतात. हे या ऑनलाइन टिचिंग मध्ये अजिबात होत नाही.

आता पाचवी पासून ते बारावीपर्यंत ऑनलाइन टिचिंग सुरू झाल्यामुळे, आपले नेहमीची अभियांत्रिकी महाविद्यालये कशी मागे राहतील? अर्थात अभियांत्रिकी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ही ऑनलाइन टिचिंग ची सुविधा गेल्या दहा वर्षांपासून उपलब्ध आहे. भारतातील प्रमुख सात आय. आय. टी. व बंगुळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रकल्प गेली दहा-बारा वर्षे चालविला जातो. त्याचं नाव आहे एन. पी. टी. एल. अर्थात नॅशनल प्रोजेक्ट ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्सड लर्निंग. हे व्हिडिओज हे आय. आय. टी. मधल्या अतिशय तज्ज्ञ प्राध्यापकांकडून अतिशय व्यावसायिक वातावरणात व स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग केलेले असतात. अर्थात अशा प्रकारच्या व्हिडिओज मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग बऱ्याचदा नसतो, त्यामुळे शिक्षकांना शिकवण्याचे दडपण येत नाही. याशिवाय शिक्षकांना एका विषयाचे एकोणचाळीस ते चाळीस तासिका शिकवल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन लाख रुपये हे तात्काळ मेहनताना म्हणून मिळतात. त्यामुळे हे व्हिडिओ बनवण्याची इच्छा आय. आय. टी. मधल्या बऱ्याच प्राध्यापकांमध्ये अजूनही आहे. या व्हिडिओचा वापर एखादी सूक्ष्म किंवा क्लिष्ट संकल्पना समजावण्यासाठी संपूर्ण भारतभरातील प्राध्यापक करतात, व तो तसा व्हावा हीच त्याची फलनिष्पत्ती आहे. यामध्ये शिकवण्याचे प्राध्यापकांनाही फार दडपण येत नाही, कारण समोर विद्यार्थी नसतात व कॅमेऱ्याच्या पाठीमागे टीव्हीसारख्या स्क्रीन वरती टेली प्रॉम्प्टर सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे पुढील वाक्य काय बोलायचे आहे, हे त्या प्राध्यापकांना कॅमेर्‍याकडे रोखुन पहाताना समोर दिसत असते. त्यामुळे त्यामुळे शिक्षकांना या तासिकेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करता येते व त्याचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होतो.

मात्र सध्याच्या टाळेबंदीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील प्राध्यापकांना एका वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शासकीय नियमांमुळे किंवा संस्थाचालकांच्या दडपणामुळे, घरी राहूनच काम योजनेनुसार काही तरी काम केले असे दाखवावे लागते. मग यासाठी या प्राध्यापकांना वेगवेगळे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच शिकवण्याच्या विषयाशी थेट सम्बंध नसलेले किरकोळ विषयावरील वेबिनार सुद्धा ऑन लाईन करावे लागतात. कुठलाही निमशहरी व ग्रामीण भागातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या कॉलेजमधील एखाद्या विभाग हा अचानक पणे एखाद्या वेबिनार किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम जाहीर करतो आणि या शर्यतीमध्ये सर्व प्राध्यापक पेपर सहभागी होतात. मागच्यााा महिन्यात आयआयटी मुंबईने आयोजित केलेल्या एका दोन आठवडे कालावधी असलेेेल्या फाकल्टी प्रोग्राम मध्ये सुुमारे 12000 शिक्षक सहभागी झााले होते. त्यामुळे आपण कल्पना करू शकता की असे प्रकारचे वेबिनार घेणे किती अवघड आहे आणि त्यातील किती सहभागी लोकांना या पूर्ण प्रकल्पाचे महत्त्व समजत असेल. एवढ्या मोठ्या संख्येने जर सहभाग असेल तर प्रत्येक सहभागी हा पूर्ण क्षमतेने हा कोर्स अटेंंड करतो आहे किंवा नाही हे पाहणे केवळ लोगिन टाईम आणि लॉग आऊट टाइम यावर अवलंबून असू शकते. ज्यांंनी ठराविक कालावधी लॉग इन केलेले आहे त्या सर्वांना हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. अशा प्रकारचा प्रमाणपत्रांचा उपयोग हा आपले वैयक्तिक बायो डेटा फुगवण्यास होत आहे. त्यातून प्रत्यक्ष ज्ञानार्जन व त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फायदा कितपत होईल हे अजून पुढे समोर आलेले नाही. अर्थात यावर पुढे बराच विचार होईल व या वरती काहीतरी योग्य उपाय केला जाईलच.
पालकांचा विचार केला तर, अजूनही बऱ्याच मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय घरात मुलांसाठी स्वतंत्र स्मार्टफोनची व्यवस्था नाही. त्यामुळे अशा शिक्षणासाठी बऱ्याचदा मुले हे आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर देतात व जेवढा वेळ आहे शिक्षण चालू आहे तेवढा वेळ आई-वडिलांना मोबाईल वापरता येत नाही. स्वतःची महत्त्वाची काही कामे असतील तर त्यासाठी त्यांना मोबाईल मिळत नाही, कारण मुलांचे शिक्षण जास्त महत्त्वाचे ही शिकवण आपल्याकडे आहेच.
जेवढा वेळ ऑनलाइन शिक्षण चालू आहे, तेवढा वेळ मुले घरात गुंतून राहतात, हा एक जाणवण्यासारखा फायदा मात्र या सगळ्या प्रकारामुळे होत आहे. तरी पण कधी कधी असे वाटते की बस झाल ऑनलाइन शिक्षण. कधी एकदा मुले आणि शिक्षक प्रत्यक्ष समोरासमोर येतात आणि खऱ्या अर्थाने इंटर ऍक्टिव्ह लर्निंग चा अनुभव मुलांना पूर्वीसारखा देता येईल. अर्थात आपली काही बहुमूल्य मते या विषयावरती असतील तर त्यांचे स्वागतच आहे. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वस्तुस्थिती चांगल्या प्रकारे मांडली आहे. ग्रामीण भागात पावसाळा संपल्यानंतर बिनभिंतीची शाळा सुरू करता येईल का हे पाहीले पाहीजे. शहरात ज्यांना इंटरनेट फोन इत्यादी साधने उपलब्ध नाहीत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी काही तरी कल्पना लढवावी लागणार आहे. आत्ता मला तरी काही सुचत नाहीये.

खरं आहे.शाळा कॉलेज जुलै पासून 33% उपस्थिती ने चालू करण्याचा विचार चालू आहे.तसं झालं तर बरंच होईल.
अनेक शाळा शिक्षकांना फारसे ऑनलाईन क्लास, वेबिनार घ्यायचा अनुभव नसताना इतर उदाहरणे बघून लगेच शिकून चालू करावे लागले.लहान मुलं (ऑनलाइन क्लास आता प्रि स्कुल पासून चालू आहेत) मोबाईल/लॅपटॉप आणि वेब कॅम हाती लागला की मोकळी सुटतात.एकमेकांना आणि टीचर ला आनंदाने हाय हॅलो करत असतात.टीचर अगदी संयमाने 'कॅमेरा बंद करा, चॅट विंडोत सारखे टाईप करू नका' असं रोज 15 वेळा सांगत राहतात.मुलांना ओरडता येत नाही कारण सेशन रेकॉर्ड होत असते.शिवाय पालक जज करतात.सर्व पालक मुलांशेजारी बसत नाहीत कारण घरून काम चालू असते.एका घरात 2 मुलं असतील तर 2 डिव्हायसेस ची व्यवस्था लागते.
इतक्या अडचणीतूनही ऑनलाईन क्लासेस घेणाऱ्या टीचर्स चं कौतुक वाटतं.सध्या ज्या काही मार्गाने गाडा चालू ठेवता येईल त्या मार्गाने ठेवावा लागतो.यातून ज्या मुलांची खरोखर इच्छा असेल ते शिकतील, बाकीचे लॉग इन करून युट्युब/गेमिंग करत बसतील.तरी काही टक्क्याला फायदा होईल हे नक्की.

माझ्या मुलाचा सकाळी सात वाजता पहिला तास असतो. रात्री टी. व्ही., मोबाईल गेम्स खेळताना बऱ्याच वेळेस तो उशिरा झोपतो व त्यामुळे कधीकधी सकाळी सात वाजता उठू शकत नाही.
हे अगदी खरे आहे. पण हे सुद्धा आपल्या रोजच्या रुटीन प्रमाणेच आहे असे समजुन जर केले तर नक्किच फरक पडेल. जरी शाळेत जायचे नसले तरी सकाळी उठुन आवरुन मग क्लास सुरु करावा. नक्कीच त्याने ताजेतवाने वाटते. मी हे माझ्या मुलाच्या बाबतित केले. सुरुवातिला तोही उठून तसाच बसायचा सतत जांभया चालु. एक दिवस त्याला सांगितले की रोज जसे शाळेला जाताना आवरतोस तसेच अताही कर. त्याने ही ऐकले(हे महत्वाचे Wink ) तो आवरून बसु लागला आणि जांभयांमधे फरक पडला.
गावाकडे अथवा ज्यंच्याकडे अजुनही ऑनलाईन शिक्षण घ्यायला साधने नाहित त्यांच्या साठी पर्याय शोधणे खरच गरजेचे आहे. तरीही ऑनलाईन शिक्षण आणी प्रत्यक्ष शिक्षक समोरा समोर शिकवतो यात फरक पडतोच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असे शिक्षण निदान येते काही महिने तरी अपरिहार्य असेल असे वाटते. हळूहळू या पद्धतीने शिकवण्याची गुणवत्ता वाढेल अशी आशा आहे.

शिक्षकांकरताहि हा "ट्रेनिंग इशु" आहे हे जाणंवतंय. वर्चुअल ट्रेनिंग हे क्लासरुमच्याच पद्धतीने चालवले जात असल्याने या समस्या उद्बवल्या आहेत. थोडक्यात पॉवरफुल टुल आहे पण ते अंडरयुटिलाय्ज होतंय, किंवा चूकिच्या पद्धतीने वापरलं जातंय. अर्थात यामागे ट्रेनिंग, कल्चर इ. समस्या आहेत पण त्या टाळण्याजोग्या आहेत. उदा: ट्रेनिंग मटिरियल (विडियो क्लिप, डेक इ.) आधीच तयार करुन ठेवलेलं असेल तर फळ्याची गरज भासणार नाहि. आणि गरज लागलीच तर स्क्रिबल/अ‍ॅनटेट करण्याची सोय वापरली जाउ असते...

आमचं ऑनलाईन स्कूल १ मे पासुन चालू झाले. Google meet var. एकूणच चांगल चालु आहे. मुलं आणि टीचर सर्वाना हे नवीनच आहे पण तिसरीत असुनही चांगल जुळवुन घेतलं मुलांनी