गावाकडचे घर

Submitted by swaroopasamant on 14 December, 2007 - 04:47

दरवळला प्रजक्तं
तो धुंद गंध गगनात
मोहरला जर्द फुलांनी
तो आम्रतरु राईत ||

त्या सान पाननीतुन
नितळ पाण्याची खळखळ
पल्याडच्या बागेतून
लक्ष्य पानांची सळसळ ||

ते मंदिर, ती शाळा
ती विहीर, तो झरा
वडाच्या पारंब्यांचा
तो सुंदर झोपाळा ||

शेतकरी कष्ट करी
जिवापाड राखी मळा
दूर शेतात वाजती
मंजुळ घुंगुर माळा ||

माडा-पोफळींच्या बागा
आंबा-काजुचीच बने
चिक्कू-पपईच्या रांगा
वड-पिंपळ ते जुने ||

रस्ता गावाकडचा कच्चा
लाल मातीचा दगडांचा
काट्या-कुट्या-झुडपांचा
तरी वाटे ओळखीचा ||

अशा सुंदर त्या गावी
घर कौलारू असावे
गायी-म्हशींनी भरलेले
चित्रा गोठ्याचे दिसावे ||

रोज स्वप्नं हे पहाते
मी पहाटेच्या पारी
कधी होईल पूर्तता
आस बाळगते उरी......
आस बाळगते उरी.......

गुलमोहर: 

स्वरुप गावाचि आठवण करुन दिलिस. मन मोहरत अशि कविता वाचुन.

मस्त जमली आहे कविता.. डोळ्यापुढे चित्र उमटते आणि कविच्या भावना पोचतात..