लहान बाळांवर संस्कार कसे करावेत

Submitted by चिमु on 25 May, 2020 - 03:29

माझा मुलगा दीड वर्षाचा आहे... प्रचंड अक्टीव आहे ...फिजिकली खुप strong आहे.... मोठ्यांच्या , देवाच्या पाया पडतो. .पण खुप अशांत आहे... काही गोष्टी ( e.g. alphabets, letters , numbers , colors , pakshi praanyanche avaaj kadhane) शिकवायच म्हटलं तर एका जागी बसत नाही, खाण्याकडे लक्ष नाही....संस्कार कसे करावेत बाळावर? किंवा कधी कधी वाटतं मी फार च विचार करत नाही ना.? खुप संभ्रमात आहे... कळत नाही कसे संस्कार करावेत ....

Group content visibility: 
Use group defaults

खूप लहान आहे अजून आत्ता फक्त त्याच्या अवतीभवती रहा आणि एकमेकाचा सहवास enjoy करा. मी शिकवलेली एकही गोष्ट माझा मुलगा शिकला असं मी ठामपणे म्हणू शकत नाही. पण मी जे शिकवलं नाही, ते तंतोतंत माझ्या सारखं करतो Happy तुम्हीच त्याला सगळं alphabet etc शिकवलं तर नर्सरी टीचर काय करेल Happy tension नका घेऊ Happy

कसे संस्कार करावेत ....>>>>>

आपल्या वागण्यातून.

जे त्याने करावे असे वाटते ते स्वत: करायला सुरुवात करा. आधीपासून करत असाल तर करत रहा. मुलं शिकतात आपल्याकडे बघून.

याला कॅरट आणि स्टिक पद्धतीची जोड दिली की अजून लवकर बदल पहायला मिळतात.

( e.g. alphabets, letters , numbers , colors , pakshi praanyanche avaaj kadhane) शिकवायच म्हटलं तर एका जागी बसत नाही,>>>>>>> चिमु, त्याचे वय काय आणि तो एका जागी कसा बसेल? आणि वर हे शिकायचे असेल तर तो अजिबात बसणार नाही.सद्या तो लहान आहे,त्याचा सहवास पुरेपुर घ्या.हे वय परत येत नाही.
माझा मुलगा जेवत नसे,त्यावेळी प्राण्यांची मोठीमोठी चित्रे असलेली पुस्तके फक्त जेवताना त्याच्यापुढे ठेवत असे आणि तोंडाने चित्रानुरुप गाणी किंवा कॉमेंट्री!मग घास घेतला जायचा. अगदी ११व्या महिन्यापासून तो चित्रे एन्जॉय करायचा.माझ्या लेखी जेवला हे मोठे होते.

मुलं लहान वयात कॅन्डी क्रश खेळायला शिकली की मोठी झाल्यावर निर्णय घेण्याची क्षमता खूपच विकसित होते आणि ते हुशार बनतात.

मुले आजूबाजूच्या मंडळींना पाहून शिकतात. त्याच्यावर जे संस्कार व्हायला हवेत असे वाटते तसे आचरण घरातील सगळे करत असतील तर तो आपोआप शिकेल.

त्याच्या कुठल्याही प्रश्नाला 'गप्प बस' हे उत्तर देऊ नका. उत्तर खूप अडचणीचे वाटत असेल तर आपण नंतर बोलू म्हणून वेळ टाळून न्या आणि नंतर विचार करून त्याला समजेल असे उत्तर द्या. कित्येकदा मुलांचे प्रश्न खूप निरागस असतात पण आपल्याला ती निरागसता दिसत नाही.

आणि घरात धुमाकूळ घालणे हे या वयात करायलाच हवे. करत नसेल तर प्रॉब्लेम. अधून मधून ड्रॉईंग वगैरे ऍक्टिव्हिटी ठेवा म्हणजे तुम्हालाही थोडी उसंत मिळेल Happy Happy

किंवा कधी कधी वाटतं मी फार च विचार करत नाही ना.>>>

नका इतका विचार करू. तुम्ही नॉर्मल राहा, त्यालाही राहूदे. संस्कार करतोय हा विचार डोक्यात ठेऊन संस्कार होत नाहीत, संस्कार हे आपल्या जडणघडणीचा भाग आहे, ते जितके नैसर्गिकरित्या होतील तितके जास्त चांगले होतील.

आता तरी त्याला हृदयाशी धरत जा, आवळून चिवळून खूप प्रेम करत जा. कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत हे खरे आहेच परंतु, आपले व लहान बाळांचे भावनिक नाते , हे स्पर्शामधुन खू प दॄढ होते आणि आयुष्यभर त्याचे पडसाद आपल्याला जाणवतात. राजसी बरोब र सांगतायत हे अल्फाबेटस व अ, आ इ, ई कुठे पळून जात नाही. आख्खं आयुष्य पडलय.
.
देवाचं काही शिकवायचं तर काय हे मात्र मला माहीत नाही. जस्ट गणपतीचं 'प्रणम्य शिरसा देवं ..' ते १२ नावांचं स्तोत्र म्हणत जा. किंवा भूपाळि वगैरे लावुन ठेवा.
.
माझ्या बाळाचे अंग पुसताना, रोज संध्याकाळी मी रोजाची गाणी ऐकत होते किंवा मग जगजीत सिंग Happy ती पोटात असतानाही बारीक आवाजात ट्रान्झिस्टर पोटावर ठेउन गाणी ऐकत असे. ती अगदी बाळ असतानाच, दूध पीताना, उंउंउं ... अशी गायल्यासारखी गोड आवाज काढत असे Happy

हा विचार करत आहात हे ऊत्तम
संस्कार करायला हे वय फार कमी आहे असे काही नाही. हल्ली तर लोकं गर्भसंस्कारही करतात. तुमचे पिल्लू तर छान दिड वर्षांचे झाले आहे.

या वयातले संस्कार म्हटलं तर देवाच्या पाया पडायला शिकवा. कश्याला पाय लागला तर त्या वस्तूच्या पाया पडायला शिकवा. मोठ्यांचा आदर करायला आणि त्यांची छोटीमोठी कामे करायला शिकवा. घरात कामवाली बाई असेल, सोसायटीचा वॉचमन वा सफाई कामगार असतील तर त्यांचा आदर करायला शिकवा. प्राणीपक्ष्यांची आवड लावा. सॉरी थॅंक्यू प्लीज हे पोलाईट वर्ड शिकवा. शेअरींग शिकवा. प्रॉमिस पाळायला शिकवा आणि खोटे बोलायचे नाही हे तर अगदी मनावर ठसवा

शक्य तितक्या चांगल्या सवयी लावा. जसे की वेळेवर झोपणे, ऊठणे, रोज दात घासणे, हाताने जेवणे वगैरे.. पण अतिशिस्तीचा बडगा नको. वैयक्तिक मत.

जर त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल तर त्याला या वयात मूळाक्षरे, आकडे, फ्ळं फुले, रंगांची ओळख वगैरे खुशाल शिकवा. फक्त खेळीमेळीत शिकवा. उदाहरणार्थ, रंगांची ओळख जेम्सच्या गोळ्यांतून करून दिली तर कोणता पोरगा शिकणार नाही. शेप्सचे छान खेळ मिळतात. आकडे शिकवताना त्याच्या आवडीच्या गोष्टी मोजायला लाऊ शकता. मूळाक्षरांची गाणी गा, छान कलरफुल चार्ट मिळतात, सर्वात बेस्ट घराच्या भिंतींवर एक ब्लॅकबोर्ड बनवा. किंवा घराच्या भिंतीच त्याच्या नावे केल्यात तर ते सर्वात ऊत्तम.

सध्या लॉकडाऊन आहे पण उठेल तेव्हा आणि गार्डन्स वगैरे चालू होतील तेव्हा पोरगा दोन वर्षांचा झाला असेल. शक्य झाल्यास रोज बाहेर फिरवा. अन्यथा विकेण्डलाच शक्य असल्यास जास्तीत जास्त वेळ बाहेर फिरवा. त्याला दुनिया दाखवा. घराबाहेरचे जग जे शिकवते ते आपण घरबसल्या कधीच शिकत नाही मग हे मोठ्यांनाही लागू आणि छोट्यांनाही.
मला पर्सनली या लॉकडाऊनमध्ये माझ्या अडीच वर्षाच्या मुलासाठी फार वाईट वाटतेय कारण हा त्याचा बाहेरचे जग बघायचा आणि त्यातून ज्ञानकण वेचायचा गोल्डन पिरीअड होता जो घरबसल्या थिजून गेलाय.

तुमच्या बाळाऐवढे माझे बाळं असताना धोका नसलेल्या सगळ्या गोष्टी मी करु द्यायचे. पसारा, गोंधळ व्हायचा पण ते बिझी रहायचे. तुम्ही त्याचे बाबा सतत बोलत रहा त्याला . कुठलीही सुचना निगेटिव्ह टोन ने देऊ नका. हे करू नकोस म्हणण्याऐवजी तू ह्याच्या ऐवजी हे करतोस का असे म्हणत रहा मला या टीपचा फार उपयोग झाला Happy
बाकी गाणी म्हणा, गोष्टी सांगा, चित्रांची पुस्तक वाचून दाखवा, घरच्यांशी बोलायला लावा. मुख्य म्हणजे एन्जॉय करा Happy !
तुम्हाला आणि बाळाला खूप खूप शुभेच्छा !

माझा मुलगा एक वर्षाचा झाला तेंव्हापासून एक ते दहा आणि ए तो झी म्हणायला लागला - असे सांगणारे नातेवाईक मित्र असतात . इग्नोर करायचे . एक लक्षात ठेवा तुलना करायची नाही . कोणी लवकर चालायला लागते . कोणी लवकर बोलू लागते .
कोणी लवकर लिहू लागते .

अल्फाबेट नंबर मॅट मिळतात ते घेऊन या . एक ते दहा रांगेने मांडायला सुरु करा . हळूहळू चुकीचे लावा बघा तो कसा तुम्हाला करेक्ट करेल .

त्याला कार्टून आवडते का ? Cocomelon ची छान कार्टून असतात toddler साठी . कॉऊंटिंग आणि अल्फाबेट्स शिकवतात . मोबाईल वर दाखवू नका .शक्यतो TV वर थोडा वेळ . थोडा वेळ दाखवल्याने काही होत नाही . छान ग्रास्प करतात .
माझा मुलगा इथूनच भरपूर गोष्टी शिकला . पॉटी ट्रेन पण अर्धा तिथूनच झाला . शेयरिंग करणे कसे महत्वाचे आहे हे शिकला . त्याही फेव्ह कँडी असेल आणि तुम्ही म्हणाला मला पण खायची आहे तर तो अर्धी तोडून देतो . तीच गोष्ट दुसरी लहान मुले घरी आली तर खेळणी शेयर करतो. त्याला आम्ही स्मॉल लेटर्स कधीच शिकवले नाहीत पण आता सगळी स्वतः शिकला . पोएम्स आणि स्टोरीज शिकला . बऱ्याच गोष्टी पेरेंट्स म्हणून आपण शिकवू शकत नाही ते हे toddler लर्निंग कार्टून शिकवतात.

आणि थोडा उशिरा शिकला तरी काही होत नाही . सगळे catch up करतातच .

बालसंगोपनावर चांगली पुस्तकें सुचवू शकेल का?
referenceसाठी, कधी कधी आपणही त्यातून शिकतो असे वाटते. (विशेषतः मुलाच्या बाबांसाठी ☺️)

वंशवेल
What to expect when you are expecting series .

'मुले अशी वाढवा' हे डॉ आर के आनंद यांचं पुस्तक (मराठी अनुवाद डॉ विश्वनाथ राणे) हे पुस्तक मला सर्वाधिक आवडलं होतं.

आपल्या प्रश्नावर सगळ्या मान्यवरांनी उत्तम सल्ला दिला आहे. तुमच्या बाळाला त्याचं बालपण जगु द्या आणि तुम्हीपण ते एन्जॉय करा. मुलं अनुकरणातुन प्रत्येक क्षणाला शिकतच असतात त्यांच्या पध्दतीने.

sarvanche khup manapsun abhaar. tumhi dilelya sallyancha ani anubhavacha mala nakkich upyog hoil...khup dhanyawaad...

मेघा, तुमची मुलगी थोडेफार शब्द बोलते ना,मग अजिबात काळजी करू नकोस.नुसते अं अन् करत असती तर डॉक्टर ना / speech therapist la विचारायला पाहिजे होते.
माझाही मुलगा अडीच वर्षांनंतर बोलायला लागला.आमच्या डॉ.ने हेच विचारले होते की तो alphabets bolato na,mag kalaji karu naka.