कुछ अलग करना है तो .... गुलजार

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 25 May, 2020 - 01:38

कुछ अलग करना हो तो, भीड से हटके चलिए,
भीड साहस तो देती है, मगर पहचान छीन लेती है. .

क्षणाक्षणाने सुरु असलेला विलक्षण प्रवास म्हणजे जीवन. जीवनाच्या या प्रवाहात बालपणाचा काळ ओसरून तारुण्याची चाहूल लागते आणि या अद्भुत प्रवासाबद्दलचे कुतूहल जागृत होते. नवनवीन आव्हानांची क्षितिजे खुणावू लागतात आणि त्याचवेळी डोळ्यापुढे दोन भिन्न दिशेला जाणारे मार्ग दिसू लागतात.... एका मार्गावर भौतिक सुखाच्या मागे असणाऱ्या माणसांची अविरत धावपळ चालू असते. पण दुसरा मार्ग ...... त्या मार्गावर लोकांची गर्दी नाही, अनाठायी धावपळ नाही, आहे ते खडतर मार्गावर होत असणारे मार्गक्रमण आणि त्यावरून अखंड चालण्यासाठी आवश्यक असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती .

दोन्ही रस्ते अखेर काळाच्या निर्णायक बिंदू पर्यत पोचतातच. पहिला रस्ता चाकोरीबद्ध आहे पण तो आयुष्यात स्थिरता देतो, एकमेकाच्या साह्याने जगण्याचे साहस देतो पण माणसाच्या अस्तित्वाला कोणतीच ओळख देत नाही.

पण दुसरा रस्ता काही जगावेगळ करण्याच्या धेय्यान प्रेरित झालेल्या लोकांसाठी आहे. हा मार्ग खडतर आहे, क्लेशकारक आहे पण जीवनाला, नावाला शाश्वत ओळख देतो.

म्हणूनच गुलजारजी म्हणतात स्व:ताची ओळख निर्माण करायची असेल तर भाऊगर्दी पासून दूर होऊन दुसऱ्या मार्गावरून मार्गक्रमण केल पाहिजे.

हा अप्रतिम शेर वाचत असताना मला नेहमी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या “ Roads Not Taken” या कवितेतील दोन ओळी आठवतात :-

Two roads diverged in a wood, and I ----
I took less travelled by,
And that has made all the difference.

गुलजारजी असो अथवा रॉबर्ट फ्रॉस्ट असो किंवा जगात ज्यांनी इतिहास घडविला ते कुणीही असोत निश्चितच दुसऱ्या मार्गावरचे यात्रिक होते आणि आहेत.......!

सतीश कुलकर्णी
9960796019

Group content visibility: 
Use group defaults