एक तू

Submitted by किमयागार on 24 May, 2020 - 23:52

मारणारे खूप येथे तारणारा एक तू
जेवणारे खूप येथे पोसणारा एक तू.

गोकुळीच्या रासरंगी रंगणारा एक तू
भावभोळ्या राधिकेवर भाळणारा एक तू.

कालियाच्या शेपटीला ठेचणारा एक तू
कंसमामाच्या मदाला जाळणारा एक तू.

सज्जनांच्या रक्षणाला जन्मणारा एक तू
दुष्टबुद्धी दानवांना दंडणारा एक तू.

कोणत्या रूपात पाहू सांग ना रे मी तुला?
कोणत्याही रूपात मजला भावणारा एक तू.

----------मयुरेश परांजपे----------

Group content visibility: 
Use group defaults

छान

सुंदर