शौच - सकाळी, रात्री कि प्रेशरनुसार? पाश्चात्य कि भारतीय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2020 - 17:56

हा धागा टवणे सरांच्या आंघोळ धाग्यातील चर्चेच्या ओघात विषय आला म्हणून स्वतंत्र चर्चेला घेतला असला तरी विरंगुळा वा विडंबन या कॅटेगरीत चर्चा अपेक्षित नाही. झाल्यास हरकतही नाही.

लहानपणापासून मनावर ठाम कोरलेले की सकाळी उठल्यावर दात घासायचे, मग टू नंबरला जायचे, मग आंघोळ आणि त्यानंतर न्याहारी. कॉलेजला जाईस्तोवर यात कधीही खंड पडला नाही. जे लोकं कधीही प्रेशर आले की जायचे ते मला बेशिस्त वाटायचे. एक भाऊ होता जो रोज रात्री झोपायच्या आधी जायचा त्याला मी शौचालयातले घुबड असे नाव ठेवले होते. एकूणच कुठली वेगळी सिस्टम मला पटलीच नव्हती.

मग कॉलेजला गेलो. कधीही लेक्चरला जाऊ लागलो. हॉस्टेलला राहू लागलो. विकेंडला, पीएलमध्ये, रात्र रात्र जागरण करू लागलो. एकूणच दैनंदिन व्यवहाराचे ताळतंत्र बिघडले. सवयीनुसार सकाळी जायचे आणि पाणी ओतून यायचे. खरे काम मात्र दिवसभरात कधीही होऊ लागले.

कॉलेज संपले ऑफिस सुरू झाले. आता सकाळी वेळेवर ऑफिसला जातो. माझ्या मूळ सवयी आणि संस्कारांप्रमाणे सकाळचा टाईम फिक्स करण्यास काही हरकत नव्हती. मात्र सकाळी ती पंधरा मिनिटे तिथे आजाs आजाss करण्यापेक्षा बिछान्यात लोळत पडलेले काय वाईट. तेवढेच पंधरा मिनिटे झोप जास्त या विचाराने ती सवय मोडली. मग ऑफिसला गेल्यावर कामाच्या नादात जेव्हा सुचेल, वेळ मिळेल, खरेच प्रेशर येईल, किंवा काम करून बोअर होईन तेव्हा चेंज म्हणून असे कधीही जाऊ लागलो. घरी तर शक्यतो सुट्टीच्या दिवशीच जाणे होऊ लागले आणि ते ही अर्थात केव्हाही. कारण सुट्टीच्या दिवशी मुळातच झोपायचा आणि ऊठायचा टाईम पार गंडलेला असतो.

आता यातही घरात ईंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकार आहेत. घरी आवर्जून भारतीय बैठकच वापरतो. पण ऑफिसमध्ये पर्याय नसल्याने वेस्टर्नच वापरावी लागते. म्हणजे एकंदरीत वेस्टर्न पद्धतीचा वापर जास्त होऊ लागला आहे, जे प्रेशर पुर्ण हलके करायच्या अनुषंगाने परिणामकारक तसेच सहज सुलभ नसते. मुळातच आतड्यापोटाचे आजार असलेल्या मला हे जास्त घातक वाटते.

आता काही दिवसांनी नवीन घरात शिफ्ट झाल्यावर तिथे मात्र दोन्ही पाश्चात्यच बैठकी असल्याने प्रकरण आणखी अवघड होणार आहे. लहानपणीच्या सारया सवयी, संस्कार आणि पद्धती बदलून जाणार आहेत. त्यामुळे एकूणच जगभरात काय पाळले जाते हे जाणून घेण्यास उत्सुक.

मला कल्पना आहे की या विषयावर आपल्याकडे उघडपणे बोलायला संकोचतात. त्यामुळे येणारया प्रतिसादांचे विशेष आभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका मैत्रीणीकडे माझे एक पुस्तक होते. तिचा नवरा रोज आत नेऊन पुस्तकं वाचतो समजल्यानंतर मी बाहेरच्यांना पुस्तकं देणंही थांबवलं.
>>>>>

हे योग्य केलेत. दुसर्‍याचे पुस्तक आत नेऊन वाचणे कहर आहे.
आपलाच फोन न्यायला हरकत नाही. उलट तो मुद्दाम न्यावा म्हणजे ईतर कोणी वापरणार नाही Happy
बाकी स्वच्छतागृहात हल्ली मास्कही न्यावा लागतो. आणि तोच मास्क दिवसभर नाकाला असतो. मला हे जास्त कसेसेच वाटते Sad

ऋन्मेष तुम्हाला ऐवढा प्रोब्लेम मग मला प्रश्न पडतो शाहरुख खान कस कस करत असेल ......मॅनेज?
>>>>
हे नाही कळले.. काय मॅनेज?

प्रतिभासाधनेच्या मार्गात येणाऱ्या अवजड गोष्टी टाळून त्यावर पर्याय कसा शोधावा हे सरांकडून शिकण्यासारखे आहे>> अगदीबरोबर.
आणि सरांनी खुलासा केला ते उत्तम झालं. नाहीतर 'जाडजुड पुस्तकं सांभाळत बाकीची कसरत कशी जमत असेल?' असे प्रश्न आम्हा पामरांना पडले असते.

असे बुक होल्डर वापरायचे तर मग संडासात दोन कमोड बसवावे लागतील, एक आपल्याला , एक पुस्तकाला

कंटाळा आला की आलटून पालटून वापरायचे

सारखं सारखं त्याच झाडाला कशाला ?

Proud

स त कुडचेडकर

कमोड पिवळी पडली पुस्तकाचे लेखक

ए कमोड पे जाते हैं
यही पुस्तक हम पढते
अन तेज पवन वाहे

पत्थर की हवेली में
शीशू के पटाखो से
गरजे जो ध्वनी कब तक
इ कमोड में जाते हैं

Pages