ती एक अनामिका

Submitted by सचिन चंद्रकांत ... on 24 May, 2020 - 11:37

.... ती एक अनामिका ....

तुझ्यासोबत बोलावंस वाटतं,
मनसोक्त हसावंस वाटतं...

डोळे भरून बघावंस वाटतं,
आठवणीत तुला साठवावंस वाटतं...

तुला खूप काही द्यावंस वाटतं,
तुला नेहनी जपावंस वाटतं...

त्या क्षणांना आपलंसं करावं वाटतं,
प्रत्येक वेळी सोबत तुझ्या रहावंस वाटतं...

आयुष्याच्या वळणांवर नेहमी सोबत ठेवावंस वाटतं,
स्वप्नाची वीण बांधतांना त्यात तुला गुंफावंस वाटतं...

तुझ्या त्या सुखांना मन भरून बघावंस वाटतं,
तुझ्या त्या हास्याला सांभाळावसं वाटतं...

अशीच तू नेहमी सुखात असावी असं वाटतं,
ईश्वराच्या चरणी फक्त हेच मांगावसं वाटतं...

✒️सचिन चं लावणे....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users