साल्मन फिश

Submitted by vasant_20 on 23 May, 2020 - 16:06

हजारो अगतिक पाय,
हजारो किलोमीटर चालत
निघाले आहेत तिथे,
जिथे त्यांना वाटायचं
काहीच नाहीये...
कदाचित दूर झाले असतील
त्यांचे गैरसमज आणि
जिवंत झाल्या असतील जाणिवा...
आता दिसत असतील त्यांना
त्यांचे अडकलेले जीव
आणि कदाचित झाले असतील...
सगळे साल्मन फिश!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीराजी धन्यवाद!
सध्या जो मजुर वर्ग परत घरी निघाला आहे त्यावर आहे कविता.
यातील बरीच लोक शहरात आली होती कारण त्यांच्या पोटा पाण्याची सोय मुळ गावात नव्हती.
आता इथे कठीण परिस्थिति निर्माण झाली आहे तर ते परत निघाले आहेत जिथे काहीच नव्हतं, पण मातृभूमीची ओढ आहे म्हणुन निघाले आहेत ते.
साल्मन फिशची उपमा दिली आहे कारण तो जिथे जन्मतो तिथेच जाऊन मरतो ( वर म्हंटल्या प्रमाणे तो प्रजोत्पादनासाठी जातो, पण मृत्यु मात्र तिथेच होतो जन्मस्थळी, म्हणून ती उपमा)
या लोकांसाठी देखील आता जे काही व्हायच आहे ते मुळ गावीच व्हाव ही इच्छा आहे म्हणुन एवढे हजारो मैल चालत ते निघाले आहेत.

कवितेचा गाभा समजलेला. पण प्रतिसादांत रसग्रहण करुन रसभंग झाला.. असो!
कविता छानच आहे. पुलेशु!

मन्याजी धन्यवाद!
पुलेशु चा अर्थ नाही माहीत जरी जुना सदस्य असलो तरी! माफ करा.

मस्त!
अजून बेहतरीन करू शकला असतात..