ती: काल्पनिक

Submitted by सचिन चंद्रकांत ... on 22 May, 2020 - 14:11

.... ती: काल्पनिक ....

त्या वळणावरती मला,
ती सहज भेटली होती...

स्वप्नांच्या त्या दुनियेत,
अलवार ती रंगली होती...

जीवनाच्या त्या पटावर,
आयुष्य ती खुलवित होती...

मनसोक्त ती आपले,
रंग ते उधळीत होती...

बेधुंद पामरा परी,
ती सुखात बावरली होती...

स्वप्नांचे ते बंगले,
ती सहज सुखवित होती...

आयुष्याच्या त्या वळणावरी,
ती मुक्त श्वास घेत होती...

पाहुनी ते क्षण हृदयात दाटले,
स्पंदनांनी मन माझे हे बावरले...

त्या वळणावर ती,
खळखळून हसली होती,

स्वप्नाच्या त्या दुनियेत,
अलवार ती रंगली होती...

त्या वळणावरती मला,
ती सहज भेटली होती...

✒️सचिन चं लावणे....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users