हे मन

Submitted by वैभव जगदाळे. on 21 May, 2020 - 12:41

तु नाहीस सोबत अजूनही ...
पण तुझ्याच आठवणींनी भरलयं हे मन...
तुला जिंकावं वाटतय अजूनही...
पण प्रत्येक वेळेला फक्त हरलयं हे मन...
स्वतःच स्वतःवर रागावतय...
पण प्रेमात जरा जास्तच पडलय हे मन...
वर-वरचं हसणं दाखवतय...
पण आतून जरा जास्तच रडलय हे मन...
सावरण्याचा प्रयत्न करतय खूप...
पण तुझ्याशिवाय काही जाणतच नाही हे मन..
बोलण्यासाठी धडपड करतय खूप..
पण मनातलं ओठांवर आणतच नाही हे मन,..
तु स्वीकारशील किंवा नाकारशीलही याला...
पण शेवटपर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करेल हे मन...
तु येशील की नाही हेही माहित नाही याला...
पण आता तुला तेव्हाच विसरेन जेव्हा मरेन हे मन...

Group content visibility: 
Use group defaults