ऑनलाईन कोर्सेसबद्दल

Submitted by पद्म on 19 May, 2020 - 23:52

नमस्कार माबोकर,
लॉकडाऊनच्या काळात घरी राहून सुरक्षित असाल अशी अपेक्षा, आणि सुरक्षितच रहा अशी प्रार्थना!

लॉकडाऊन चालू झाले, तेंव्हा ते ईतके दिवस चालेल याचा अंदाज आला होता; पण या दिवसांत काय करावं ते कळत नव्हतं. आता ईतके दिवस आळसात लोळून आणि चित्रपट पाहून घालवल्यानंतर काहीतरी प्रॉडक्टीव करावसं वाटतंय. ईतके दिवस असेच निघून गेले याचं आता वाईट वाटतंय, पण आता पुढच्या दिवसांत (आता ते किती असतील, ते मलाही नाही सांगता येणार!) नविन काहीतरी शिकायची ईच्छा आहे.

माझी सर्व वाचकांना विनंती आहे, की त्यांनी एखादा ऑनलाईन कोर्स सुचवावा जो मला घरी बसून करता येईल. त्या कोर्सचा पुढे मला उपयोग होईलच अशी माझी काही अट नाहीये, फक्त काहीतरी नविन शिकल्याचं समाधान जरी मिळालं तरी भरपूर! तुम्ही कोणत्याही प्रकारचा कोर्स सुचवू शकतात फक्त तो किती दिवसांत करता येईल ते सुद्धा सांगा.

माझ्याप्रमाणे बाकी लोकांनाही काही फायदा होईल अशी अपेक्षा! आणि याच प्रकारचा दुसरा एखादा धागा असेल, ज्यावर या विषयाची चर्चा झालेली असेल, तो सुद्धा सुचवा.

धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफिलिएट मार्केटिंग चा कोर्स करून स्वतःची अफिलिएट वेबसाईट बनवणे. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसर्‍याचे प्रॉडक्ट्स प्रमोट करून ऑनलाईन विकणे आणि त्याचे कमिशन कमावणे. हे कमिशन प्रोडक्टच्या किमतीच्या ५% पासून अगदी ७५% असते.

तुम्हाला प्रॉडक्ट्स विकत घ्यावी लागत नाहीत कि शिप करावी लागत नाहीत. अगदी पेमेंट गेटवे सुद्धा तुमचा नसतो. तुमचे काम फक्त लोकांना त्या प्रोडक्टच्या वेबसाईट पर्यंत पोहोचवणे एवढेच असते. त्यांनी विकत घेतले कि तुम्हाला कमिशन मिळते. काही लोक अगदी दिवसाला हजारो $$ कमावत आहेत (अर्थात ते हे गेली कित्येक वर्षे करताहेत).

प्रॉडक्ट कसे निवडावे, त्याची वेबसाईट कशी बनवावी, त्याचे मार्केटिंग कसे करावे, हे सर्व अगदी स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून तुमचे फ्री अकाउंट बनवा. पहिले १० ट्रेनिंग्स मोफत आहेत ज्यात हे सर्व एंड टू एंड कसे चालते ते explain केले आहे. उरलेल्या ४० ट्रेनिंग्स मध्ये प्रत्येक गोष्ट एकदम डिटेल मध्ये explain केली आहे. तुम्ही पहिल्या १० ट्रेनिंग्स नंतर ते पार्ट्स youTube वर बघून शिकू शकता किंवा त्यांची प्रिमियम मेंबरशिप घेऊन तिथेच शिकू शकता. ५० ट्रेनिंग्स असाईन्मेंट सह पूर्ण करायला साधारण महिनाभर लागे. पहिले १० लेस्न्स तुम्ही एक आठवड्याभरात पूर्ण करू शकाल.

https://onlinemoneyreality.com/LearnAffiliateMarketing

https://www.coursera.org/in

https://www.udemy.com/

कु़किंग पासुन कंप्युटरपर्यंत अक्षरशः हजारोनी सर्टीफिकेशन कोर्सेस आहेत. काही फ्री तर काही अगदी नॉमिनल फीस मधे. मी स्वतः अपग्रेड करण्यासाठी एडव्हान्स पॉवर पॉईण्टचा कोर्स उडेमी मधुन मागच्या वर्षी केला. ९० तासांचा. आपापल्या वेळेप्रमाणे लॉगिन करता येते. कारण सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात. नोट्स सेव्ह करुन ठेवता येतात. ९० तास आपल्याला वाटुन घेता येतात. मधेच मला करोना झाल्याने गॅप पडला. तरी नंतर सहा महिनेपर्यंत मला नोटीफिकेशन येत होते.
आमच्या इथले अनेक फॅकल्टी अपग्रेड करण्यासाठी तर अन्डरग्रॅडस फर्स्ट इयरपासुन आपापल्या कोर्सशी रिलेटेड हे छोटेमोठे सर्टिफिकेशन कोर्सेस करुन सीव्हिचे वजन वाढवत आहेत. Happy