मनाची व्यथा २

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:29

लग्नाच्या बेडीत अडकताना,
मन माझे एकच विचाराने खचेल ।
प्रेम मी तुझ्यावर केलय ,
बायको वर कसं बसेल ।
प्रेम फक्त एकदाच होतं गं
तो मला दुसऱ्यांदा होणार नाही ।
पण मी संसार थाटण्या अगोदरच
खरं सांगेन।
तिला अंधारात ठेवणार नाही ।
मनात तूझ्या मी घर करू शकलो नाही
पण बायको ला मात्र दुरावणार नाही।
पण हे खरं की मी ,
तुझ्या वाचून कुणावरही प्रेम करणार नाही ।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users