जाता येता कधीतरी

Submitted by मनोजकुमार देशमुख on 17 May, 2020 - 00:47

मला वाटते सहज दिसावी, जाता येता कधीतरी
पाहताच ती गोड हसावी, जाता येता कधीतरी

बघता बघता श्रावण सरला, पाऊस हा आला नाही
कोसळतील का ढग विजेसह, जाता येता कधीतरी

डोक्यावरचे दही विकाया, म्हातारी आरोळी दे
सारे घ्यावे भाव न करता, जाता येता कधीतरी

मंदिराच्या दारा मध्ये, तो देव बसुनी भिक मागतो
लावेल काय भोग पुजारी, जाता येता कधीतरी

गावाकडचा रस्ता अजूनही, खड्डया मधल्या वाटेचा
का मंत्र्याला बसतील धक्के, जाता येता कधीतरी

वृद्धाश्रमात आई सोडली, झाली होती म्हातारी
गाडी मधून मग तो येतो, जाता येता कधीतरी

जाणे येणे सुरूच येथे, मुक्ती देईल सुटकरा
परतूनी ना येणे व्हावे, जाता येता कधीतरी

Group content visibility: 
Use group defaults