नयन पावसाळी

Submitted by राजेंद्र देवी on 14 May, 2020 - 21:04

नयन पावसाळी

जेव्हा ती जवळून जाते
हृदयी एक अनामीक कळ येते

जेव्हा ती टाळून जाते
पावलांना अचानक बळ येते

जेव्हा ती वळून जाते
ओठात शीळ घुमवून जाते

जेव्हा ती जवळ येते
श्वासात गंध मिसळून जाते

जेव्हा ती सोडून जाते
नयन पावसाळी करून जाते

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users