"रिचर्ड बर्टन" एक अद्भुत अवलिया पुरुष. आपल्या पैकी अनेकांनी थोड्याफार प्रमाणात वास्को द गामा, कोलंबस, युआंग शुआंग, हरून अल रशिद या मातब्बर मंडळी बद्दल थोडाफार वाचलं किंवा काहीतरी ऐकलं असेलच. याच पठडीतील इंग्लंडमधील "रिचर्ड बर्टन" एक अद्भुत अवलिया पुरुष. विशेष म्हणजे याची महाराष्ट्राला प्रथम ओळख करून दिली ते आपले सह्याद्रीकार श्री. सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी. याच जोगळेकरांना दिलेला शब्द पाळत श्री. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे. थोडक्यात बाळ सामंत =शापित यक्ष=बाळ सामंत हे समीकरण प्रुव्ह आहेच.
"माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी भारतात पोस्टिंग इथे आल्यावर पाचच महिन्यात त्याने भाषेची परीक्षा दिली. जिथे जाईल तिथे भाषा शिकण्याचे त्याचे वेड आमरण टिकले. भारतात तर मराठी हिंदी गुजराती तेलगू पासून संस्कृत भाषेचे सुध्दा प्राथमिक धडे गिरवले. जगाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर पर्शियन, पंजाबी, तेलगू, पूश्तू, मुलतानी,तुर्की, ई अनेक भाषांचा अभ्यास केला. अरबी भाषा त्याला एकनिष्ठ पत्नी प्रमाणे. यामुळे जगातील एकूण तीन भाषाप्रभूत त्याची गणन होऊ लागली. जवळपास एकोणतीस भाषा आणि दहाबारा बोली भाषांवर प्रभुत्व. खरंच ग्रेट.. रिचर्ड बर्टन यांच्या आयुष्यातील महत्वाची घटना म्हणजे मक्का मदिना यात्रा. वेषांतर करून नव्या अवतारात बिनधास्त वावरणे. सिंध प्रांतात तो असाच फिरला. मक्का मदिना यात्रेत भेट देण्यास अन्य धर्मियांना बंदी किंबहुना तसा फतवा काढला होता. इतर कुणी असे साहस करण्याचा प्रयत्न केला त्यांना ठार मारण्यात आले. तरीही त्याने हा धोका जाणून बुजून पत्करला. त्याचा मुख्य हेतू म्हणजे अरब लोकं जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करणे. 'मिर्जा अब्दुल्ला' हे नाव त्याने लावले. इजिप्त मधील भयानक प्रवास. कैरो सुएझ मग तांबड्या समुद्रातून येनबो पर्यंत, पुढे मक्के जाई पर्यंत चे वर्णन तर कहरच. ती खरी पुस्तकात वाचण्यात मजा आहे.
यशस्वी मक्का भेटी नंतर सोमालीलॅण्ड पूर्व आफ्रिका, नाईलचा ध्यास सहकारी स्पेक त्या सोबतचे संबंध पुढे टांगानिका सरोवराचा शोध. अशी अनेक धाडसी प्रकरणे.
बाळ सामंत यांनी रिचर्ड बर्टन यांची पत्नी इझबेल यांच्या बद्दल ही भरपूर लिहिलं आहे. अश्या अवलिया माणसा बरोबर संसार करून शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी स्त्री.. इझबेल साठी खरंच मनापासून सलाम..
मनसोक्त हिंडफिर्या या माणसाचे त्याकाळचे प्रवास वर्णन यांचे चाळीस हून अधिक खंड आहेत. दोन मोठी काव्ये, शेकडो लेख सर्वात महत्त्वाचं म्हणजे अरेबियन नाईटस चे अनुवादित केलेले खंड.
१८५१ ते १९०० या पन्नास वर्षांत त्याने प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केली. अनेक पुस्तके इथं आता यादी दिली तर कमी पडेल..
इतकं काही करूनही त्यावर त्याच्या मायदेशाने अन्याय केला असेच हे बर्टन चरित्र वाचल्यावर दिसून येते...
असा हा "शापित यक्ष" जरूर वाचावा असे.
रिचर्ड बर्टन
Submitted by योगेश आहिरराव on 14 May, 2020 - 00:30
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचलंय शापित यक्ष हे पुस्तक.
वाचलंय शापित यक्ष हे पुस्तक. परत एकदा वाचायला हवं असं वाटलं, छान ओळख करून दिल्ये.
नक्कीच ...... पुन्हा पुन्हा
नक्कीच ...... पुन्हा पुन्हा वाचावे असेच !
शापित यक्ष च्या मूळ इंग्रजी
शापित यक्ष च्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे नाव काय?
Arabian nights 1001 वाचलं. पण त्यात सहाशेसाठ गोष्टी होत्या. टीपा महत्त्वाच्या आहेत.
.{ बाळ सामंत यांनी अनेक वर्ष
.{ बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे.}
मूळ मराठीच असावं.
वाचलंय शापित यक्ष हे पुस्तक.
वाचलंय शापित यक्ष हे पुस्तक. परत एकदा वाचायला हवं असं वाटलं, ....... .अगदी अगदी.
वा! खूप छान परिचय आहे. नक्की
वा! खूप छान परिचय आहे. नक्की वाचेन.
छान परिचय
छान परिचय
अरेबिक मौखिक आणि लेखी दोन्ही
अरेबिक मौखिक आणि लेखी दोन्ही प्रकारच्या साहित्याच्या दस्तावेजीकरणासाठी बर्टन ओळखला जातो, शिवाय अनेक अन्य भाषांचा आणि संस्कृतीचा अभ्यासक. त्याला 'शापित' का म्हटले आहे? नाही समजले.
Edward Rice यांचे बर्टन
Edward Rice यांचे बर्टन चरित्र सगळ्यात चांगले मानले जाते. मी ते सध्या वाचत आहे. हा माणूस अफाट होता.
Edward Rice यांचे बर्टन
Edward Rice यांचे बर्टन चरित्र
मीही वाचत आहे.
गौरी देशपांडे ह्यांनी अरेबियन
गौरी देशपांडे ह्यांनी अरेबियन नाईटस् चा फार सुंदर अनुवाद केला आहे. मराठीत. तळटिपांसहित. अवघड काम होते.
गौरी देशपांडे ह्यांनी अरेबियन
प्र का टा.
@ योगेश आहिरराव: ट्रेकिंग
@ योगेश आहिरराव: ट्रेकिंग सध्या बंद आहे का? कित्येक महिने झालेत तुमची प्रवासवर्णन वाचली नाहीत. मायबोलीवर तुमच्या सारखे मोजकेच ट्रेकर उरले आहेत जे ट्रेक करून आल्यानंतर त्यावर नित्यनियमाने लिहीत असतात. त्यामुळे आवड असूनही तेवढे साहस नसल्याने (मी शारीरिकदृष्ट्या तेवढा कणखर नाही, आणि मोजक्या साधन सामग्रीत ट्रेकिंगदरम्यान येऊ घातलेल्या कोणत्याही आकस्मिक परिस्थितीस तोंड देण्याची माझी मानसिकदृष्ट्या तयारी नाही) माझ्यासारख्या मंडळींना तुमचे लेख वाचून तेवढेच स्वतः आभासी तरी गेल्याचे समाधान होते.
हल्ली मायबोलीवर ट्रेक वर्णनं
हल्ली मायबोलीवर ट्रेक वर्णनं (सर्वांचीच ) कमी झाली आहेत हे खरं आहे.
धन्यवाद मंडळी ....
धन्यवाद मंडळी ....
@ राहुल व srd ..... नवीन ठिकाणी फिरण थोडफार सुरू आहे पण लिखाणाला तुर्त वेळ काढता येत नाहीये. त्यात हल्ली बायको मुले घेउन रिपीट मोड वर किल्ले आणि घाटवाटा करत आहोत. पण लवकरच पुन्हा लिखाण सुरुवात करायचा प्रयत्न करतो..