Submitted by Jaywant Wankhade on 12 May, 2020 - 06:15
कशास चाल वेगळी तुझी अजून चालतो
लढायचे नसूनही उगाच आव आणतो
पळायचे कसे कुठे मरण पुढ्यात ठाकले
जगायचे म्हणून मी अता घरीच थांबतो
स्वतःस रोग लागता अलग रहायचे घरी
घरोघरी फिरून का असा प्रसाद वाटतो
अनोळखीच वाटते घरात आपल्या मला
स्मरायला जुने दिवस जुने कपाट चाळतो
हवा नसे सुगम तरी मला इथे टिकायचे
मिळेल चांगले उद्या म्हणून वाट पाहतो
© जयवंत वानखडे,कोरपना
जिल्हा चंद्रपूर
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा