देण्यासाठी..

Submitted by मनोजकुमार देशमुख on 10 May, 2020 - 14:05

किती वाट मी तिची पाहिली येण्यासाठी
निरोप तिचाच, निघते आहे जाण्यासाठी

एक बाटली, जपून ठेवली उश्यापाशी
चालून जाणे, नको कुटाणे पिण्यासाठी‌

सारे माझे, मला हवे हा विचार खोटा
भरून पोट, न हात उठावे घेण्यासाठी

मीच चढावे, आंब्याच्या त्या झाडावरती
कच्चे पक्के , रोज बहाणे खाण्यासाठी

राव नको, करुणेचा बाकी भाव पाहिजे
शिल्लक असते थोडे नक्की देण्यासाठी

Group content visibility: 
Use group defaults