नप्रेम कहाणी

Submitted by RAM NAKHATE on 10 May, 2020 - 06:41


प्रत्येकाच्या जिवनात एक अगळवेगळ वळण येत पण ते कोणत्या मार्गे कोठे जाणार यावर त्याच भविष्य ठरत असत, अस नाही तर कोणत्या गोष्टीचा विचार करतात किंवा विश्वास ठेवतात यावर असत. तर तो काय करत आहे, योग्यवेळी योग्य निर्णय घेतो का? प्रत्येक गोष्टीत पुरेपुर उतरु शकतो का? ति अत्मसात करण्याची त्यात ताकत आहे का? हे या सर्व गोष्टींचा विचार करणारे खुपच कमी व्यक्ती असतात. पण कांही गोष्टींचा कमीत कमी विचार केलेल बरं. सांगण्याचा उद्देश असा की काही व्यक्ती खुप विचार करणार्या असतात.

"विचार, विमर्श करणे चांगले तिथेच असते, जिथे तो विचार व्यर्थ जाणार नाही."

अशी एक कहाणी माझ्या मित्राची आहे. जो खुप वैचारीक आहे, त्याला मैत्रीविषयी लगाव व प्रेमाची अपुलकी आहे. प्रेम-मित्र ,सगे-सोयरे व थोर-मोठे या सर्वांचा आदर पुर्वक सम्मान करणारा व आपल्या चुकांची कबुली देणारा आहे.
माझा मित्र महेश तो माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान पण वागणुकीने खुप मोठा आहे. तो लहानपणापासुन प्रत्येक गोष्टीत एक आनंद शोधणारा,मनमिळाऊ व समजदार आहे. एका छोट्याशा गावापासुन एका मोठ्या शहरात वावरला आहे.
मित्राविषयी सांगाव तेवढ कमीच असतं, असो तर मि महेशची एक नप्रेमाची कहाणी सांगत आहे.
महेश आपल शिक्षण पुर्ण करुन शहरात एका कॉलेजमध्ये अकाऊंट डिपार्टमेंटला कामाला लागला. महेशला कामाला लागुन ६महीने झाले.
महेश सर्व तयारी करुन कामावर पोहचला, तो reception ला जाताच तिथे त्याला एक मुलगी दिसली ति दिसायला खुप सुंदर होती. तिला पाहताच महेश तिच्या प्रेमात पडला, त्याच्या मनात अनेक विचारांनी थैमान घातल होत. कारण ति तशी होती, कोणीही पाहताच तिच्या प्रेमात पडाव इतकी सुंदर होती. तिचा गोरा गोमटा चेहरा, नक्शीदार केस, छोटस नाक, काळसर काजळी डोळे, खुजा बांधाची आणि खुपच छान अशा केसांच्या बटा, गडद पोपटी रंगाचा पंजाबी परिधान केलेली जणु राणीच दिसत होती. तसा महेशही दिसायला काही कमी नव्हता. तिला पाहत महेश रियाला बोलतो.
'कोण गं रिया ही'
'अरे ही पुनम, आपल्या इथे अंजलीच्या ठिकाणी आली आहे.' रिया बोलते.
महेश 'काय'
'कुठे काय ति आपल्यात डिपार्टमेंटला काम करणार आहे. आणि ति ना माझी close friend आहे.' रियाचे बोलने संपते.
महेश आत आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो. Account ला महेशचे अनेक सोबती होते पण त्यात आजच एका नविन colleagueची भरती झाली ति पुनमची.
आजच पुनमची Joining होती ति कामाला सुरुवात करते. आजचा पुर्ण दिवस मॅनेजरच्या सांगण्याप्रमाणे महेश तिला कामाची शिकवण देतो. पुनम व महेश चे कॅबीन लागुनच असतात. त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद वाढतच होता.
रोजच्याप्रमाणे सर्वकाही व्यवस्थीत चालु होत, फक्त महेशच्या विचारात किंवा त्याच्या विचार श्रेणीत वाढ झाली होती. आजकाल जो तिच्या विचारात रमायला लागला होता.
जेवणाची वेळ झाली होती, महेश कँन्टीकडे जात होता इतक्यात पुनमने आवाज दिला.
'अरे...ये महेश '
महेश मागे फिरत 'बोल नां'
'तुझा मोबाईल नंबर दे ना' पुनम
महेश लगेच तो आपला मोबाईल काढतो
'बोल तुझा नंबर'
तिच्या नंबरवरती missed call देतो व तो तिचा नंबर my best friend p या नावाने save करतो.
आज जनु महेशच्या प्रेमाला आरसा दाखवल्या सारख झाल.

" एखाद्याला मनातुन मागाव,
ते देवाने आपसुकच द्याव "

असच काहीस घडत होत, पुनम जाता-जाता महेशकडे पाहुन हसत होती. हसताना तिच्या गालावरची कळी आणखीनच फुलुन दिसत होती.
आज महेशला मॅनेजरच्या त्रासाचा खुप कंटाळा आला होता. एकेकाळी खुप गोड बोलनारा सारखा महेश महेश करणा मॅनेजर आज महेशवरती नजर ठेवुन होता. कारण महेशच पुनमशी जवळीक राहण मॅनेजरला पाहवल नाही बहुतेक, एकदा मॅनेजर महेशच्या खोलीवर अचानकच गेला. आणि महेश मोबाईल घेउन WhatsApp उघडुन पुनमची व महेशची ऑनलाईन चाटींग वाचु लागला. हे महेशला तेव्हांच खटकल. महेशचा एक मित्रही पुनमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. हे महेशच्या लक्षात येताच तो त्यांना बोलने जवळपास बंदच केल होत.
आज ऑफिसमध्ये महेश आपापल्या विचारात मग्न होता. महेशचा विस्कटलेला मुड पाहुन पुनम त्याला जवळ बोलवुन त्याचा हात हातात घेऊन समजुत काढु लागली. तिच त्याच्यावरच प्रेम महेशला दिसत होत, तिच महेशला पाहुन हसवण्याचा प्रयत्न पाहुन महेश पुनमवरील प्रेम आणखी द्रढ होत होत. त्याला गरज होती ती फक्त त्याची समजुत काढणार्या एक आपल्या प्रेमळ व्यक्तीची. ति गरज पुनम पुर्ण करताना दिसुन आली त्याचवेळी तो तिला आपली प्रियसी, अर्धांगणीच्या रुपात पाहत होता. सोप्या अर्थी सांगायचे झाले तर तिच्यात तो पत्नी रुप पाहत होता.
महेशच्या अशा या विचारमय वागण्याचे कारण म्हणजे त्याची ति गरीब परिस्थीती आहे. पावलो-पावली प्रत्येक गोष्टीचा विचार करणारा होता. महेशला माहीत नव्हत की पुनम चांगल्या घरची आहे. पण प्रेमात माणसाला इतर कोणत्याही गोष्टी दिसत नाहीत "प्रेम हे अंधळ असत म्हणतात" ते खर आहे.
हळुहळु महेश व पुनम ऑफीसच्या बहेरील गप्पा मारायला लागले होते. फोनवरती त्यांच रोजच बोलनं, ऑनलाईन चाटींग आणि ऑफीसला जाताच एकमेकांना प्रसन्नता दर्शवणं. अस याच रोजच चालु होत. ते ऑफीसमध्ये एकमेकांना पाहुन हासायचे,रुसायचे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत. ऑफिसातल्या ऑफीसात चिट्टीवरती लिहुन बोलायचे. कधी कोनाचे रुसवे फुगवे झालेच तर एकमेकांचा हात हातात घेऊन समजुत काढतं. महेश कधी कुरबुर झाले तर २-३ दिवस जेवन सोडुन देत. तेंव्हा त्याची समजुत दोघी मैत्रीनी मिळुन काढत. रिया त्याची चांगली मित्र होती, तिचा आपल्या मित्रावरती खुप जिव होता ति त्याला वेळोवेळी समजावुन सांगत असत. प्रेमाच्या भानगडी करु नको परिवारीकडे व आपल्या करियरकडे लक्ष केंद्रीत करण्यास सांगत असत. रियाच्या सांगण्याचा महेशवरती तितपत काही मोठा परिणाम होत नसतं.
आतातरी पुर्ण ऑफीसला कळाल होत की महेश व पुनमची प्रेमकहाणी चालु आहे. महेशने ठरवल होत की माझ प्रेम पुनवरती आहे पण पुनमच प्रेम आपल्यावर आहे की नाही. हे जाणु घेण्यासाठी त्याने तिला (प्रपोज) प्रेमाची मागणी घालण्याच ठरवलं. आज १० फेब्रुवीरी,१४ फेब्रुवारीला valentine day त्या दिवशी तिला कॉफीला बाहेर बोलवाव व प्रपोज कराव. हा बेत महेशने आखला.
ठरल्या प्रमाने महेश १४फेब्रुवारी ऑफीसला सुट्टी होताच तो तिच्या मागे पार्किंगमध्ये जात...
'पुनम ' महेश बोलला.
'काय' पुनम हळु आवाजात बोलत होती. जसेकी तिला अगोदरच माहीत असाव की तो तिला आज प्रपोज करेल.
'कॉफीला जायच का बाहेर'महेश
' please आता नको मला घरी काम आहे, लवकर घरी जायच आहे'
हे ऐकुन महेशला काय करावे कळत नव्हते. त्याने लागलीच प्रपोज करायच ठरवलं. आणि तो बोलायला लागला.
'मला तुझ्याशी काही बोलायच आहे'
'काय?,बोल ना' पुनम
'मि तुझ्या....शेट यार कॉफी घेऊयात चल ना.'
'तुला मि सांगीतल ना, काय ते बोल मला जायला हवं.'
महेश एकदम मोठा श्वास घेऊन बोलतो,'I love you...Poonam'
'काय अरे काय बोलतोस तु, मि तुला एक मित्र समजते बसं. मला माहीत होत की तु मला असच काहीतर बोलनार, रिया मला मनत होती पण sorry हे शक्य नाही.'
महेशला वाटते तिचा नंबर मि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये my love या नावाने सेव करायला हव होत. मि त्या my best friend p या नावाने सेव केल म्हणुन ति मला मित्र समजते. पण खरतर तस काही नसतच मुळात तिला हे माहीतच नसत. महेश डोक एकदम सुन्न पडल होत त्याला काय कराव कळत नव्हतं. तरी तो आपला तोल सांभाळत....
'काय म्हणाली रिया'
'हेच की आजकाल तु ,माझी खुप काळजी करतोय'
महेश 'हो करणारच ना'
'चल बाय, मला उशीर होतोय' बोलुन ति निघुन जाते.
महेश तिच्या पाटमोर्याकडे पाहत उभा असतो. त्याला विचार करायला लावणार्या, प्रेमाची ओळख करुन देणार्या आणि मनाच्या गाभार्यात घर करुन वावरणार्या पुनमने एका क्षणात परक करुन टाकल होत. अशा या प्रेम कहाणीत महेशच्या काळजाचा बळी जाणे आहे का? असा विचार करत जो एक जोराची आरोळी फोडतो 'i love you...Poonam' त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या असतात. नजर अजुनही पुनमकडेच पाहत असते. पुनम एक नजर त्याच्याकडे टाकते आणि निघुन जाते.
महेश उतरत्या मनाने, आपल्या ऑफीसमध्ये शांत बसतो. आता तो कोणालाही बोलत नाही पुनम ऑफीसमध्ये असुनही तिच्याकडे पाहतही नाही. ति बोलण्याचा प्रयत्न करते पण हा तिला होईल तेवढे कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करतो. असेच दिवसामागुन दिवस जात असतात इतक्यात एक दिवस उजाडतो.
महेश ऑफीस सुटताच तो घराकडे जात असताना पुनम आवाज देते. 'महेश '
'काय' महेश
'ऐक ना'
'काय बोल' मागे फिरुन तिच्याकडे पाहत.
'मि ही जॉब सोडली आहे, उद्यापासुन मि येणार नाही'
महेश अश्चर्याच्या नजरेचे पाहत 'काय? पण का?'
'हो, उद्याला माझी engagement आहे.' पुनम
तिच बोलन ऐकुन तो पुढे निघुन जातो. त्यावेळी त्याला काहीच सुचत नाही. त्याला खुप दुःख झालेले असते पण काय करनार दु:खा शिवाय त्याच्यापुढे दुसरा पर्याय नसतो. ति प्रेम करत नाही म्हणुन सुद्धा तो तिच्याकडे पाहुन खुश होता. तिच्या त्या लोभस चेहर्याला पाहुन जगत होता पण आता तेही नाही. तो आपल्या डोळ्यातुन येणार्य अश्रुंच्या धारा पुसत तेथुन निघुन जातो.
दुसर्या दिवशी तो ऑफिसला जातो, व तिच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत बसतो. महेश रोज त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहुन तिची आठवण काढत असतो. महेशला पुनमने तिच्या लग्नाची पत्रीका पाठवली. काही दिवसात तिच लग्न असत, आजही ति त्याला बोलण्याचा प्रयत्न करते पण तो तिला बोलत नाही. तिचा आवाज ऐकताच तो फोन कट करतो.
आजही तो त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहुन तिच्या विचारात मग्न होतो तिच्या आठवणी त्याला खुप दुःख देऊन जातात. म्हणुन तो तिच्या कॅबिनकडे पाहत नाही. पण त्या कॅबीनमधील ति खुर्ची रिकामी नाही, त्याठीकाणी उत्कर्षा नावाची नविन मुलगी कधीच कामावर रुजु झाली आहे. आजही उत्कर्षाच्या ठिकाणी महेशला त्याच्याकडे पाहुन हसताची पुनम दिसते. मग हळुच तिचा हात हतात घ्यावा व तिला हळु अवाजात बोलाव वाटतं. पण त्या ठिकाणी पुनम नसुन उत्कर्षा कामात व्यस्त असलेली दिसते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी प्रतिसाद उद्धट वाटणार आहे ... भयानक कंटाळवाणी आहे ... या प्रकारच्या रटाळ प्रेमकथा आवडीने वाचणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग असतो ... प्रतिलिपी किंवा फेसबुकवर जरा शोधलंत तर या कथेला दाद देणारे चाहते तुम्हाला सापडतील .. या ठिकाणी त्या वर्गातले लोक जवळपास अजिबात नाहीत....

स्वतःच्या कथा लिहायला सुरुवात करायच्या आधी चांगल्या लेखकांचं साहित्य वाचलंत तर बरं होईल असं वाटतं ... लिहायची एवढी घाई कशाला... तुम्हाला आनंद मिळत असेल लिहिण्यातून तर ठीक आहे लिहीत राहा पण वाचकांना काहीतरी चांगलं देण्याच्या इच्छेतून लिहीत असाल तर दर्जा सुधारायला अफाट वाव आहे ...