पाऊस आणि तू

Submitted by मनसखी on 8 May, 2020 - 11:01

धुंद बेधुंद सरी बरसताना
अलगद व्हावा स्पर्श तुझा...
एकमेकांत नजरकैद होताना
समजू लागतील अबोल भावना....

गुंफत जाताना बोटे अलगद
चढेल मग चिंब पावसाची नशा....
ओठांना नसेल मग कश्याची पर्वा
नजरेला नजरेची कळता भाषा...

तिमीरात या सोबतीने तुझ्या
सहजच घट्ट होईल बंध...
मेघपुष्पांवरती सावरता तु मला
नकळत जडला तुझा छंद.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Chan