केले घाव फुलांनीच..

Submitted by मनोजकुमार देशमुख on 7 May, 2020 - 14:12

केले घाव फुलांनीच, मी पाहिले आहे
प्रेमात कितीदा हे अश्रू , वाहिले आहे

जुगारात जगण्याच्या, डाव लावला मोठा
हातात शून्य ते बाकी, राहिले आहे

शिकाऱ्यास कुठे उमजावे, कैद असे होणे
काय जाळ्यात सावजाने , भोगिले आहे

पुजले पाचवीस असेल, तुटणेच मनाचे
लावणे जीव ते कुठे मी, त्यागिले आहे

दोष यात काय द्यावा , मनोज सागराला ?
वाळूचेच होते घर जे, मोडले आहे

Group content visibility: 
Use group defaults

छान!!