अविरत देणे...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 5 May, 2020 - 04:35

अविरत देणे हेच शिकावे
वत्सल वृक्षापरी

मधुर फळे ती पक्षी चाखीती
घरट्या मधूनी पिले राखिती

प्राण्यांसाठी बनून चारा
पथिकाना तो दिला निवारा

दूषित हवा ते स्वये घेऊनी
परती केली प्राणवायू ने

किती औषधी गुण देहाचे
मूळ, खोड अन त्या पांनाचे

सुकल्या फांद्या गळली पाने
आता पालवी कुठे नव्याने?

देण्यासाठी काही न उरले
तरीही देणे नाही सरले

काष्ट होऊनी चिता जाळीली
अन प्रेता ते मुक्ती मिळाली

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता! Happy

निसर्गाचाच भाग शेवटी
देणे देतो मुक्तहस्ताने
मनुष्यजातच मुळी लोभी
ओरबाडणे काही सोडत नाही

पुलेशु!