लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने का ऊघडत आहेत??

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2020 - 13:46

लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.

आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.

बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.

सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.

मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...

पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक शेअर करा>>>>>>

मी मागे दिल्या होत्या, त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं होतं, त्यामुळे दर वेळी तेच तेच मागू नका.
फावला वेळ असतो इतका तर शाखाच्या रॉयल स्टॅग, मास्टरस्ट्रोक डिलक्स व्हिस्की, बॅगपायपर इ. च्या जाहीराती शोधा आणि बघा.

स्मॉल मिलाते जाओ, लार्ज बनाते जाओ

चिअर्स

सर्व यशस्वी उद्योग पती मदिरा सेवन करतात.
सैन्यात दारू पिने हे वर्ज नाही..
दारू किती प्यावी हे ज्याला समजतो तो त्याचा आहारी जात नाही..
लहान वयात दारू पिवू नये ते तुमच्या शरीरावर घातक परिणाम करते .
प्रतेक देशात दारू विकत घेण्याचे आणि पिण्याचे legal vay वेगवेगळे आहे.
जास्तीत जास्त २५ वर्ष आहे.
आपल्या देशात २१ वर्ष आहे(पण भारतीय कायदे पाळण्यात बेशिस्त असल्या मुळे फक्त कागदावर आहे).
दारू शरीरास घातक आहे ह्या विषयी शंका नाही.
पण घातक हा फॅक्टर पकडला तर अनेक खाण्याचे पदार्थ प्रमाण पेक्षा जास्त किंवा रोज सेवन केले तर दारू एवढेच घातक आहेत.
म्हणून फक्त दारू ला बदनाम करण्यात अर्थ नाही.
दारू चे व्यसन लागते आणि त्या वर तुम्हाला स्वतः नियंत्रण ठेवावे लागत ज्याला हे जमत तो दारू ची मज्जा घेतो.
ज्याला जमत नाही त्याला फळ भोगावी लागतात.
पण काही वेळासाठी तुम्हाला relax करण्याची ताकत दारू मध्ये आहे.
किमती म्हणाल तर १ लाख रुपये ७५० ml पर्यंत दारूच्या किमती आहेत.

सरकारचे सारे पाच वर्षे मुकाटपणे मानायचे हे सर्व बाबींना लागू कि दारू पुरतेच हे लागू ?>>>>

मानायचे नाही असे ठरवलेत तर काय करणार आहात? चुकीच्या सरकारी धोरणांना असा विरोध ज्यामुळे सरकारला झक मारत धोरण बदलावे लागेल असा कुठला प्लॅन आहे का तयार?

सरकार बदलणे हा एक पर्याय आहे निवडणुकी द्वारे.
पण हे बदलून दुसरे कोणाचे सरकार आणायचे ते पण ह्यांची झेरॉक्स copy.
सरकारी बेजाबदर,जनता विरोधी निर्णयाला विरोध करण्यासाठी सामाजिक संघटना लागतात .
पण अशा संघटना अस्तित्वात नाहीत ह्या आहेत त्यांना राजकीय महतत्वाकांक्षा आहेत त्या थोडे नाव झाले की राजकारणात उतरतात .
परत स्थिती मूळ पदावर.
शिवसेना,अरविंद केजरीवाल,शेतकरी संघटनेचा शेट्टी ही काही उदाहरणे.

लिंक शेअर करा>>>>>>
मी मागे दिल्या होत्या, त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं होतं
>>>

ती पोस्टही शेअर करा.

प्रतेक देशात दारू विकत घेण्याचे आणि पिण्याचे legal vay वेगवेगळे आहे.
>>>

वयाची अट का असते?

पण घातक हा फॅक्टर पकडला तर अनेक खाण्याचे पदार्थ प्रमाण पेक्षा जास्त किंवा रोज सेवन केले तर दारू एवढेच घातक आहेत.
>>>>

एखादा अति चहा पिऊन वा पोटाच्या वर डाळभात खाऊन धिंगणा घालताना वा त्यामुळे कारवरचे नियंत्रण सुटलेल आहे का?

एखादा अति चहा पिऊन वा पोटाच्या वर डाळभात खाऊन धिंगणा घालताना वा त्यामुळे कारवरचे नियंत्रण सुटलेल आहे का?

एकजण ऑफिस मध्ये अति पावटा खाऊन आला होता
अलमोस्ट मारलंच होतं त्याने सगळ्यांना
बाहेर पळून गेलो म्हणून वाचलो
Happy

मानायचे नाही असे ठरवलेत तर काय करणार आहात? चुकीच्या सरकारी धोरणांना असा विरोध ज्यामुळे सरकारला झक मारत धोरण बदलावे लागेल असा कुठला प्लॅन आहे का तयार?
Submitted by साधना on 4 May, 2020 - 21:12
>>>

ओके म्हणजे सरकारला झक मारत धोरण बदलावे लागेल असा प्लान रेडी नसेल तर सरकारी धोरणांना विरोध करू नये वा निषेध नोंदवू नये

बरोबर !

आशुचॅम्प
अपेक्षित उत्तर.
नका शोधू.
किंवा तुमच्याकडे जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा शोधा
शोधले तर उत्तर नक्की देईन

एकजण ऑफिस मध्ये अति पावटा खाऊन आला होता
अलमोस्ट मारलंच होतं त्याने सगळ्यांना
बाहेर पळून गेलो म्हणून वाचलो
Happy
Submitted by आशुचँप on 4 May, 2020 - 22:38

>>>

एखाद्या बेवड्या नवरयाच्या तोंडाचा वास सहन करत किती बायकांन त्यांच्या शेजारी झोपावे लागत असेल. बिचारयांना पळूनही जाता येत नसेल.

अर्थात हे प्रत्येक घरात होत नाही हा युक्तीवाद आधीच मान्य Happy

अरे तेव्हाही नव्हते दिलेस
पळून गेला होतास
आता काय डोंबल देणारेस
तुला सोयीस्कर नाहीये ना ते
तुला जे मुद्दे अडचणीत आणतात तिथून पद्धतशीर पळ काढतोस
नवीन काहीतरी कर की कधीतरी

चहाबद्दल बोलूच नका ऋन्मेषभाई... दारूऐवजी चहा बंदी असती आणि आज चहा पावडर ची दुकाने उघडणार असती ... याच्या डबल रांग लागली असती इतके चहा चे व्यसनी लोक आहेत...

Arguably a wrong decision to open wine shops.

Whatever we have earned in last 45 days, we might loose due to opening of liquor shops!

Bad part of it is, photos and videos of Q's in front of such shops are being shared around as if they are Q's in front of temples!

It is also wrong to call drunkards as economy warriers.

It is nothing but *insult* of the real corona warriers!

आशुचॅम्प
लिंक द्या अन्यथा मी हरलो. खुश Happy

याच्या डबल रांग लागली असती इतके चहा चे व्यसनी लोक आहेत...
Submitted by च्रप्स on 4 May, 2020 - 23:23

आर यू शुअर च्रप्स
लॉक्डऊन काळात् अश्या किती सवयी पोकळ आहेत हे मला समजलेय. सर्वांना काही ना काही अनुभव असेल..
पण दारू... नाह.. अख्खा लॉकडाऊन तीच चर्चा होती मद्यप्रेमींची

आशुचॅम्प येस मी खुश झालो
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्याला समर्थन म्हणून आपण शाहरूखचे नाव घेत हवेत काही असंबद्ध तीर मारलेत ते हवेतच विरले.
आणखी काही मुद्दा असेल तर स्वागत आहे Happy

हवेत काही असंबद्ध तीर मारलेत

खोटं बोलायला पण मर्यादा असते, तुलाही १०१ टक्के माहीती आहे मी तुझ्या शाखाचे दारूच्या जाहीरातीच्या लिंक्स दिल्या होत्या धाग्यात. वर उल्लेख केलेल्या सगळ्या दारूच्या जाहीराती शाहरूखने केल्या आहेत, त्यातल्या एका बद्दल त्याच्यावर एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांत तक्रार पण दाखल केली होती. याच्याही लिंक्स आहेत आतंरजालावर, गुगल केल्यास मिळतील

तुलाही माहीती आहेत त्या पण आता तुझं नेहमीचंच गिरे तो भी टांग उपर प्रकार सुरु झालेत

त्यामुळे काही आश्चर्य वाटलेल नाही कारण अडचणींच्या मुद्दयांना कशी बगल देतोस हे अनेकदा पाहिलं होतं त्यामुळे वेगळं काही करशील याची अपेक्षाच नव्हती.

आशुचॅम्प
हवेत यासाठी म्हणालो कारण लिंक नाही देत आहात.
असंबंद्ध यासाठी म्हणालो कारण शाहरूख दारू पितो की ओततो याचा दारूची दुकाने उघडण्याच्या निर्णयाशी काही संब्ंध नाही.
(कि आहे? चला सिद्ध करा.... Happy )

बाकी मी स्वताहून लिंक शोधल्या असत्या जर त्याचा या धाग्याशी संबंध असता.
मी तेवढेच तुमच्या अवांतर पोस्ट एंटरटेन करू शकतो जेवढी मला मजा येते. शोधाशोधीचा त्रास मी का करू Happy

दारूची चर्चा होती कारण दारू मिळत नव्हती...
चहा पावडर नसती मिळत त्याची चर्चा थोडी जास्तच झाली असती...
>>>>

चहा पावडरच नाही तर कित्येकांना त्यांच्या कित्येक आवडीच्या गोष्टी या काळात मिळाल्या नाहीयेत. पण लोकांनी केलेय कुरकुर न करता ॲदजस्ट. कारण त्याशिवाय राहता येते. हे त्यांनाही समजले.

शोधाशोधीचा त्रास मी का करू

तु नाहीच करणार हे माहीतच होतं, तुला अडचणीच्या गोष्टी कशाला शोधशील तू, पायावर धोंडा मारुन न घेण्याइतका धूर्त तू नक्कीच आहेस
तुला टाईमपास होतोय ही चांगली गोष्ट आहे, कारण आजारपणात टाईमपास करत रहावा पण त्याचे व्यसन जडू देऊ नकोस. प्रतिसाद मिळवण्यासाठी कुठल्याही थराला गेल्यास काय होते त्याचे इथे मायबोलीवरच एक उदाहरण आहे प्रसिद्ध

शाहरूख दारू पितो की ओततो

ओकतो म्हणायच आहे का?
तु त्याचा भक्त असल्याने तुला ठाऊक असेल. मला काय कल्पना नाही बाबा

चहा पावडर साठी कोणी रांगा लावुन फटके खाल्ले असते असं वाटत नाही.
आपणचं अर्थव्यवस्थेचा आहोत या आवेशात दारु दुकानांसमोर गर्दी करनार्यांना प्रसाद भेटल्याचे दाखवत होते टी. व्ही. चॅनलवाले.

तसेच फटके मॉर्निंग वॉक वाल्यांना पण देत होते पोलिस
शेवटी इतकं झालं की मग पोलिसांना मारू नका असे आदेश आले मग पोलिस त्यांच्याकडून व्यायाम करून घेऊ लागले, रोज सकाळी या मॉर्निग वॉक वाल्यांकडून व्यायाम करून घेताना फोटो येत होते पेपरात छापून.
नाशकात लोकांच्या सायकली जप्त केल्या
कुत्र्यांना फिरायला नेणाऱ्यांना दंड केला
यातली कुठलीच गोष्ट जिवनावश्यक मध्ये येत नाही तरी मुबलक प्रमाणात गर्दी करत होते.

पुण्यात कोथरुडमध्ये आणि अन्य ठिकाणी मैलभर रांगा लागल्या होत्या चिकन आणि मटन घ्यायला. शेवटी पोलिसांनी येऊन बंद करायला लावली दुकाने.

Pages