मोह मनाचे सरेल का रे

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 3 May, 2020 - 07:22

मोह मनाचे सरेल का रे
हे जग मिथ्या कळेल का रे

ब्रम्ह म्हणालो मलाच मी जे
गर्व अशाने जळेल का रे

व्यर्थ करावी कशास चिंता
दैव तयाने टळेल का रे

कर्म फळाला उगाच भ्यालो
माधव गीता स्मरेल का रे

मी तर आत्मा निलेश ना मी
बोध खरा हा पचेल का रे

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- वैष्णव
( गाललगागा लगालगागा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users