हरलेल्या बापाची कहाणी

Submitted by रूपाली विशे - पाटील on 1 May, 2020 - 12:02

हरलेल्या बापाची कहाणी

थांबा... अहो ऐका जरा
माझ्या हरलेल्या बापाची कहाणी
नाही कुणी थोर असे तो
नसे त्याची उच्च रहाणी

जग देई नाव त्याला
असे हा काळ्या मातीचा बळीराजा
पण जगणं झालयं जणू त्याच
जसं काळ्या पाण्याची सजा

जीणं त्याच विसंबले निसर्गाच्या लहरीवरी
कधी अवकाळी पाऊस तर
कधी वादळाचे संकट डोईवरी

दुष्काळात नभाकडे लावूनी नयन
पाही तो बरसणाऱ्या सरींची वाट
थकलेल्या त्याच्या लोचनांची
अश्रृ नाही सोडती पाठ..

श्रीमंतीच्या अन् शहरी जीवनाचा
किती करती तुम्ही माज
या एकदा खेडयाकडे अन् सजवून
दाखवा भूमीवर हिरवाईचा साज

देवा .. तुझे किती आंधळे सरकार
नाही कुणी रे शेतकऱ्याला वाली
कधी तरि बघ ना रे
वाकूनी आभाळाखाली

हरलेला बाप माझा मन भरूनी पाही
निष्पाप निजलेली पत्नी अन् पोरं
अन्.. अन्... दिन वाणा बापुडा
अडकवी गळयात आढयावरिल दोर

सौ. रूपाली गणेश विशे

Group content visibility: 
Use group defaults